सांगलीत आंबे व्यापार्‍याचे दुकान फोडले

बलराज पवार
गुरुवार, 17 मे 2018

सांगली - शहरातील बालाजी चौकातील एका आंबे व्यापार्‍याचे दुकान चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर फोडले. यामध्ये दुकानातील पंधरा हजाराची रोकड लंपास केली असून आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या प्रकरणी दुकानाचे मालक शरद भाऊ चव्हाण यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहै.

सांगलीच्या बालाजी चौकात फळ मार्केटमध्ये शरद चव्हाण यांचे दुकान आहे. काल रात्री मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी दुकान फोडले. आतील तिजोरी तोडून 15 ते 20 हजार रोकड लंपास केली. तर तेथेच असलेल्या आंब्याच्या काही पेट्याही चोरून नेल्या. चोरट्यांनी आंब्याच्या पेट्या फोडून आंब्याचे नुकसान केले आहे. सूमारे पंधरा हजाराचे नुकसान केले आहै.

सध्या फळ मार्केटमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.. अधिक तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत.

Web Title: Sangli News robbery in Mango businessman shop