सांगलीतील पाणीपुरवठा योजनेस शंभर कोटी देणार - राज्यमंत्री खोत 

सदाशिव पुकळे
शुक्रवार, 22 जून 2018

झरे - राज्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी समाजकल्याण सभापती बम्हानंद पडळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष गोपीचंद पडळकर उपस्थित होते.

झरे - राज्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी समाजकल्याण सभापती बम्हानंद पडळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष गोपीचंद पडळकर उपस्थित होते. पडळकर यांनी ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची येणारी अडचण मंत्र्यांना सागितली यावर खोत म्हणाले आत्तापर्यंत पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हापरिषदेला ६७ कोटी दिले आहेत. जिल्ह्यातील उर्वरित पाणीपुरवठा योजनेसाठी १०० कोटी देणार आहे. 

 राज्यमंत्री सदाभाऊ खोत पुढे म्हणाले संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छ व मुबलक पाणी मिळाले पाहिजे यासाठी लवकरच १०० कोटी जिल्हापरिषद परिषद पाणीपुरवठा विभागाला देणार असल्याचे म्हणाले.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सत्कार समाजकल्याण सभापती बम्हानंद पडळकर यांनी केला. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष गोपीचंद पडळकर,भाजप तालुका अध्यक्ष प्रभाकर पुजारी, अप्पासाहेब भानुसे,  मनोहर चव्हाण, चंद्रकांत भानुसे, सचिन खिलारी,  नितीन भानुसे,संजय पाटील,आबासाहेब कोकरे  उपस्थित होते.
 

Web Title: Sangli News Sadabhau Khot comment