साखर संकटावर ‘सकाळ महाचर्चा’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

सांगली - साखर उद्योगावर आणीबाणीची वेळ आल्याची चर्चा होतेय. उसाचा उत्पादन खर्च, साखर आणि उपपदार्थ निर्मिती, त्याची देश-विदेशातील बाजारपेठ, दरातील घसरण, सरकारी धोरण, आयात-निर्यातीचा समतोल राखण्यातील गडबड या फेऱ्यात अडकून संकटांचे ढग दाटले आहेत. नेमकी स्थिती काय आणि त्यातून मार्ग कसा काढता येईल, यासाठी ‘सकाळ’ने सोमवारी (ता. १२) सकाळी ११ वाजता ‘साखर संकट - वास्तव काय?’ या विषयावर ‘महाचर्चा’ आयोजित केली आहे.

राम मंदिर चौकातील ‘सकाळ’ कार्यालयाच्या वरील मजल्यावर मराठी पत्रकार संघाच्या हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी, शेतकरी नेते रघुनाथराव पाटील, कुंडल येथील क्रांती शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष  अरुण लाड, साखराळेतील राजारामबापू कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आर. डी. माहुली सहभाग घेणार आहेत. ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योगातील घटकांसह सर्वांनी या चर्चेला उपस्थित रहावे, असे आवाहन आहे.

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा. त्यात ऊस हा महत्त्वाचा घटक. साखर कारखानदारीने देशात शेती प्रक्रिया उद्योगाचे मोठे क्षेत्र व्यापले आहे. हा सारा प्रवास प्रदीर्घ असला तरी तितकाच अस्थिर आहे. ऊस शेती आणि साखर उद्योग या एका नाण्याच्या दोन्ही बाजू सातत्याने संकटांचा सामना करत आल्या आहेत. त्यात सरकारी धोरणांवर नेहमी आसूड ओढला जातो आणि सहकार ‘बाजारपेठेचा नियम’ सांगून हात वरत करत असते.

यावर्षी उसाची किमान आधारभूत किंमत  प्रतीटन ३ हजार रुपयांवर गेल्याने शेतकरी सुखावला खरा, मात्र एवढी रक्कम देण्याइतका साखर दर हवा आणि तो स्थिर ठेवा, अशी साखर उद्योगाची मागणी राहिली. ती पूर्ण  केली तर साखरेचा ग्राहक असलेला मतदार नाराज होईल, अशी सर्वच सरकारांना सतत भीती वाटत आली आहे. त्यामुळे साखर दर वाढू द्यायचे नाहीत, हा प्रयत्न नेहमीचाच. त्यासाठी अगदी पाकिस्तानातून साखरेची आयात करण्यापर्यंतचे धोरण ठरवले जाते. यंदा पुन्हा  असे संकट उभे ठाकले आहे. या उद्योगातील जाणकारांनी ही स्थिती अशीच राहिली तर उद्योग मोडून पडेल, अशी भीती व्यक्त केली आहे. या परिस्थितीचा नेमका वेध घेण्याचा प्रयत्न यावेळी होणार आहे.

Web Title: Sangli News Sakal Mahachacha on Sugar rate issue