सांगलीत पावणे तीन लाखाची रोकड हस्तगत

बलराज पवार
मंगळवार, 31 जुलै 2018

सांगली - महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत प्रभाग नऊमध्ये दोन घटनांमध्ये सुमारे पावणे तीन लाखाची पोलिसांनी रोकड हस्तगत केली आहे. यात विश्रामबाग पोलिसांनी एका गाडीत दोन लाख 17 हजार रुपयांची रोकड सापडल्याने तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या प्रकरणात संजयनगर
पोलिसांनी एका संशयिताकडे 59 हजार रुपयांची रोकड सापडल्याने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका निवडणुकीचा प्रचार काल (सोमवारी) सायंकाळी संपला. त्यानंतर या निवडणुकीत पैशाचा वापर होण्याच्या शक्‍यतेने पोलिसांनी कडक नाकाबंदी आणि तपासणी सुरु केली. रात्री साडेअकराच्या सुमारास विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिरज रोडवर हॉटेल खवैय्याजवळ एका स्विफ्ट गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये दोन लाख 17 हजार रुपयांची रोकड सापडली.

विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे हे रात्री
पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिरजरोडवर हॉटेल खवैय्यासमोर एक स्विफ्ट गाडी थांबलेली दिसली. त्यांनी गाडीसोबत असलेल्या तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी गाडीत दोन लाख 17 हजार
रुपयांची रोकड आढळून आली.

निरीक्षक तनपुरे यांनी तिघांनी ताब्यात घेऊन आचारसंहिता भरारी पथकाला याची माहिती दिली. त्यानंतर तेथे भरारी पथकाने येवून रक्कम ताब्यात घेत तिघांविरोधात फिर्याद दिली. भरारी पथकाचे प्रमुख प्रकाश केशव साळुंखे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात समित माधव शेट्‌टी (रा. रेल्वे स्टेशन),
उमेद दत्तात्रय माने (रा. संजयनगर) आणि विवेक नंदकुमार चव्हाण (रा. नांद्रे) यांच्यावर गुन्हा दाखल केला. प्रभाग नऊमधील एका अपक्ष उमेदवाराची ही रोकड असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, संजयनगर परिसरातील एका उमेदवाराच्या पतीकडे 59 हजार रुपयांची रोकड आज सकाळी पोलिसांना सापडली. त्यांनी याची माहिती निवडणूक विभागाला दिली असून संशयिताची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली आहे.

Web Title: Sangli News Sangli Corporation Election