जिल्ह्यात 72 कोटी कर्जवाटपाला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

सांगली - सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने शेती व बिगरशेतीसाठी ७२ कोटी रुपये कर्जवाटपाला कार्यकारी समितीने आज मंजुरी दिली. नोटाबंदी आणि साखर कारखाने गाळप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बॅंकेकडून कर्जपुरवठा सुरू करण्यात येतो. साखर कारखाना तोडणी, कामगारांना करारासाठी आणखी जादा कर्जपुरवठा करावा लागणार आहे. राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आजपासून १० हजार रुपये कर्ज देण्यास सुरवात झाली. काही अपवाद वगळता शेतकऱ्यांकडून मागणीला अल्प प्रतिसाद असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले की, जिल्हा बॅंकेने मंजूर केलेली बिगरशेती कर्जे अशी - ८ सभासदांना १.१४ कोटी, पगारदार ५४ सभासदांना ३.७१ कोटी, शेतकरी घरबांधणी- ११ सभासदांना ९३ लाख २८ हजार, वाहन खरेदी १३ सभासद - ६५ लाख २७ हजार, जिल्हा बॅंक सेवक २.३३ कोटी, दोन सहकारी दूध संघांना ३ कोटी ७३ लाख, सॅलरी अर्नस सोसायटीला २ कोटी, दोन साखर कारखान्यांना ३० कोटी रुपयांच्या कर्जपुरवठ्याला मंजुरी देण्यात आली. एकूण ४२.३१ कोटीची कर्जे दिली.

शेती कर्जासाठी २९ कोटी ५४ लाख ५२ हजार रुपये कर्जाला मंजुरी देण्यात आली. त्यात विकास सोसायटी एक - १० लाख, कॅश पेमेंटसाठी १४ लाख, शेती मध्यम मुदत कर्ज १५७६ सभासदांना २६.९२ कोटी रुपये, २९ बचत गटांना ३१.४५ लाख रुपये, द्राक्षबाग व ठिबकसाठी १.४२ कोटी रुपये कर्जाला मंजुरी देण्यात आली.जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गाळपाची तयारी टोळ्यांना आगावू रक्कम देण्यापासून होते. कारखान्यांना टोळ्यांना आगावू रक्कम देण्यासाठी कर्जपुरवठा सुरु करण्यात आला आहे. दोन साखर कारखान्यांना ३० कोटी रुपये आज मंजूर करण्यात आले. यापुढे आणखी मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांसाठी कर्जपुरवठा जिल्हा बॅंकेकडून केला जाईल. प्रत्येक वर्षी साखर कारखान्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून दिली जातात.

Web Title: sangli news Sangli District Central Co-operative Bank