शिराळ्यातील शिवरवाडीत मंदिराच्या गाभाऱ्यात खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

सांगली: शिराळा तालुक्‍यातील शिवरवाडी येथील चक्रोबा मंदिराच्या गाभाऱ्यात आज (शनिवार) सकाळी एका 50 वर्षीय पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. आमावस्येच्या रात्री हा प्रकार उघडकीस आल्याने खून की नरबळी ? याबाबत चर्चा सुरु आहे.

मृतदेहाच्या डोक्‍यात धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला आहे. त्याच्या जवळच लिंबू, हळद-कुंकू असे साहित्य सापडल्याने हा प्रकार नरबळीचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शिरसी-शिवरवाडी रस्त्यावर डोंगरावर मंदिर आहे. मंदिराचा परिसर डोगरावर निर्जन आहे.

मंदिरात खून झाल्याचे समजताच घटनास्थळी गर्दी झाली. शिराळा पोलिसांनीही घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाशेजारी लिंबू, हळद-कुंकू, पूजेचे साहित्य पडले होते. या मृतदेहाची ओळख दुपारपर्यंत पटलेली नव्हती. पाठीमागून धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसत आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असावी.

Web Title: sangli news shivarwadi murder in temple