सांगली जिल्ह्यात चार महिन्यात तब्बल १२० जणांना सर्पदंश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

सांगली - उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. या हंगामात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. गेल्या चार महिन्यांत तब्बल १२० जणांना सर्पदंश झाला आहे. ही आकडेवाडी शासकीय आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.

सांगली - उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. या हंगामात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. गेल्या चार महिन्यांत तब्बल १२० जणांना सर्पदंश झाला आहे. ही आकडेवाडी शासकीय आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.
साधारणपणे उन्हाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढते. त्यापेक्षा पावसाळ्यात शेतीची कामे सुरू होतात. पाणी साठल्यामुळे सर्प बाहेर येतात. त्यामुळे सर्पदंशाचे प्रमाण जास्त असते.

गेल्या चार महिन्यांत जवळपास प्रत्येक दिवशी रुग्णालयात सर्पदंश झालेले रुग्ण दाखल झाले आहेत. शासकीय रुग्णालय वगळता स्थानिक रुग्णालयांमध्येही रुग्ण दाखल होतात. त्यामुळे अशा रुग्णांची संख्या जास्त आहे.

पावसाळ्यात शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होतात. त्यावेळी पाणी साठल्याने सर्प बाहेर येतात. त्यामुळे  शेतात राहणाऱ्या कुटुंबांना सर्पदंशाचा मोठा धोका  असतो. अनेकवेळा अडगळीच्या ठिकाणी, दगडात सर्प असतात. तेथे लहान मुलांसह मोठ्यांनाही सर्पदंश होऊ शकतो. मात्र सगळेच सर्प विषारी नसतात. मात्र दंश झालेली व्यक्ती घाबरलेली असते. त्यामुळे त्यांना दाखल करून घेतले जाते.’’

काय काळजी घ्यावी
अडगळीच्या ठिकाणी मुलांना पाठवू नये. शेतात चालत जाताना पायाचा आवाज करावा. त्यामुळे जमिनीच्या कंपनामुळे सर्प दूर जातात. सर्प जास्त असतील तर जमिनीवर झोपू नका. थोड्या उंचीवर झोपावे.

सर्पदंश दोन प्रकारचे असतात. एकात पॅरालिसिससारखे होते. तर दुसऱ्या प्रकारात अतिरक्तस्राव होतो. अशा रुग्णांना व्हेंटिलेटर लावणे, रक्तस्राव झाल्यास पांढरे रक्त देणे अशा सुविधा वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत. औषधेही उपलब्ध आहेत. नागरिकांनी घरगुती किंवा भोंदूबाबाचे उपचार करू नयेत. 
- डॉ. पल्लवी सापळे,
अधिष्ठाता, शासकीय रुग्णालय

Web Title: Sangli News snake bite to 120 people within four month