साप, वेगवान बस आणि जीवदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

विसापूर -  साप आडवा आला. दुचाकीस्वार अचानक थांबला. मागून बस येत होती. धडक थोडक्‍यात वाचली. बसचालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. बस रस्ता सोडून कडेला गेली आणि दुचाकीस्वार व बसमधील प्रवासी वाचले. ही घटना आज दुपारी तासगाव-भिवघाट मार्गावर बलगवडेजवळ घडली. 

या प्रकारामुळे दुचाकीस्वार, चालक दोघेही गांगरून गेले. दुसऱ्याच क्षणी आपण सुरक्षित असल्याची जाणीव झाल्याने मोटारसायकलस्वार आणि प्रवाशांनी सुस्कारा सोडला. बलगवडेजवळ तासगाव रस्त्याला पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार घडला. ग्रामस्थांची पळापळ झाली. एक दुचाकी स्वार तासगावकडे चालला होता. त्याच्या पुढून एक मोठा साप सळसळ करीत निघून गेला, गाडीसमोर साप दिसताच दुचाकीस्वाराने कचाकच ब्रेक दाबले. वाहन जाग्यावर थांबवले. त्याचवेळी मागून तासगाव आगाराची बस सावळजहून (एम एच १२ सीएच ७७९३) तासगावकडे जात होती. चालक होते आर. के. माळी. बसपुढे अचानक दुचाकी थांबल्याने श्री. माळी गोंधळले. वेगाने आलेल्या बसची. धडक बसणार असेच 
चित्र होते. 

श्री. माळी यांनी क्षणात स्टेअरिंग वळले. प्रसंगावधान राखत एस. टी. च्या वेगावर नियंत्रण मिळवले. एस. टी. थोडी कलली. मात्र दुचाकी स्वार, प्रवाशांचे प्राण वाचले. दुचाकीस्वारानेही सापाला जीवदान दिले. 

Web Title: Sangli News snake, Bus and Survival