जर्मन बेकरी बाँबस्फोटाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या निरोची निवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

२००८ पासून रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात लॅब्रॅडोर जातीचा निरो दाखल झाला. तेथून त्यांची नियुक्ती सुरक्षा दलाच्या मिरज ठाण्यात झाली. पोलिस दलासाठी मात्र त्यांची निवृत्ती सन्माननीय असते. एखाद्या क्‍लास वन ऑफिसरला निरोप द्यावा तसा शाही निरोप दिला जातो. निरोलाही हाच सन्मान पोलिस दलाने शेवटपर्यंत दिला.

मिरज - मिरज शहर आपल्या अनेकविध वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. सेवानिवृत्तांचे शहर ही त्यापैकीच आणखी एक ओळख. अशा या निवृत्तांच्या शहरात आणखी एका सन्माननीय पाहुण्याची भर पडली आहे. हा आहे रेल्वेच्या श्‍वानपथकातील नीरो हा कुत्रा. पुण्यातील जर्मन बेकरी बाँबस्फोटाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावलेला हाच तो श्‍वान ही त्याच्या कर्तृत्वाची ओळख पुरेशी ठरावी. 

२००८ पासून रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात लॅब्रॅडोर जातीचा निरो दाखल झाला. तेथून त्यांची नियुक्ती सुरक्षा दलाच्या मिरज ठाण्यात झाली. पोलिस दलासाठी मात्र त्यांची निवृत्ती सन्माननीय असते. एखाद्या क्‍लास वन ऑफिसरला निरोप द्यावा तसा शाही निरोप दिला जातो. निरोलाही हाच सन्मान पोलिस दलाने शेवटपर्यंत दिला.

दक्षिणेकडून आलेल्या एक्‍सप्रेसमध्ये बाँब असल्याचा फोन आला तेव्हा सगळी एक्‍सप्रेस तपासून दिली; धोका नसल्याचा निर्वाळा दिला. पंढरपूर यात्रांसाठी मिरजेतून हजारो भाविक जातात; त्यांच्या सुरक्षेसाठी निरोने संपूर्ण गाड्या वेळोवेळी तपासून दिल्या. दोन वर्षांपूर्वी त्याचा जोडीदार सोलो निवृत्त झाला; तेव्हापासून निरो एकटाच कोल्हापूर ते सातारा विभागाची जबाबदारी सांभाळत होता.

सुरक्षा दलातून निवृत्तीनंतर पीपल्स फॉर ॲनिमल्स  संस्थेने संगोपनासाठी मागणी केली. आवश्‍यक छानबीन झाल्यानंतर ताब्यात मिळाला. सध्या पीपल्सचे स्थानिक प्रतिनिधी अशोक लकडे यांच्या प्राणिसंगोपनगृहात निवृत्तीचा कालावधी व्यतीत होत आहे. लकडेंच्या प्राणी संगोपनगृहातील इतर श्‍वानांपेक्षा वेगळी आणि महत्त्वपूर्ण पाहुण्याची वागणूक दिली जात आहे. सुरक्षा दलाचे अधिकारी अधूनमधून भेटीला येतात.

Web Title: Sangli News special dog Niro retired