वाळवा तालुक्‍यात चौथ्या दिवशीही उसदराचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

इस्लामपूर - स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वाळवा तालुक्‍यात चौथ्या दिवशीही उसदराचे आंदोलन सुरुच राहिले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज ऊस फडातील लढा रस्त्यावर आणत राजारामबापू व हुतात्मा साखर कारखान्यांच्याकडे वाहतूक करणाऱ्या 50 ते 60 बैलगाडी व ट्रॅक्‍टरच्या चाकांतील हवा सोडली.

इस्लामपूर - स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वाळवा तालुक्‍यात चौथ्या दिवशीही उसदराचे आंदोलन सुरुच राहिले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज ऊस फडातील लढा रस्त्यावर आणत राजारामबापू व हुतात्मा साखर कारखान्यांच्याकडे वाहतूक करणाऱ्या 50 ते 60 बैलगाडी व ट्रॅक्‍टरच्या चाकांतील हवा सोडली. जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना ऊसतोड घेऊ नका, असे आवाहन केले.

उरुण इस्लामपूर, वाळवा, जुनेखेड, नवेखेड, साखराळे परिसर, पुणदीवाडी, नागराळे, बोरगाव, रेठरेहरणाक्ष परिसरात रस्त्यावरून ऊस घेऊन निघालेले ट्रॅक्‍टर व बैलगाडी अडवत त्यांच्या चाकातील हवा सोडली. ऊसतोड सुरू असणाऱ्या फडात जात फडमालक व ऊसतोडणी करणाऱ्या मजूरांना उसदराचा प्रश्न मिटेपर्यंत ऊसतोड घेऊ व करु नका असे आवाहन केले. आज वाळवा तालुक्‍यातील राजारामबापू कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ झाला तर हुतात्माचा गेल्या चार दिवसांपूर्वी गळीत हंगाम शुभारंभ झाला आहे. त्यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली असून उसदराचा प्रश्न मिटेपर्यंत शिवारात कोयता व रस्त्यावर ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनाचे चाक फिरु देणार नाही अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.

कारखानदारांनीही उसदराची घोषणा केल्याशिवाय शिवारात टोळ्या पाठवू नयेत. अन्यथा, उसतोडीबरोबर वाहने रोखून त्यांच्या चाकातील हवा स्वाभीमानीचे कार्यकर्ते सोडणारच.
भागवत जाधव, तालुकाध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना.

Web Title: Sangli News Sugarcane Rate agitation in Walava Taluka