स्वाभीमानी उतरणार सांगलीच्या आखाड्यात    

अजित झळके
शुक्रवार, 11 मे 2018

सांगली - "शिवार ते संसद' प्रवास केलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी ऊस पट्ट्यातील राजकारणाबरोबर आता शहरी राजकारणातही पक्षाला उतरवण्याचे ठरवले आहे. त्यांचा स्वाभिमानी पक्ष सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची निवडणूक लढवणार आहे.

सांगली - "शिवार ते संसद' प्रवास केलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी ऊस पट्ट्यातील राजकारणाबरोबर आता शहरी राजकारणातही स्वाभीमानी पक्षाला उतरवण्याचे ठरवले आहे. त्यांचा स्वाभिमानी पक्ष सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी समविचारी पक्ष, अर्थात आम आदमी आणि स्थानिक सांगली सुधार समितीसोबत आघाडीच्याही चर्चा सुरु आहेत.  

स्वाभिमानी पक्षाची शेट्टींनी नव्याने बांधणी केली आहे. त्यानंतर प्रभाव क्षेत्रातील ही पहिलीच निवडणूक होत आहे. स्वाभिमानीचा आजवरचा प्रभाव हा ऊसपट्ट्यात व ग्रामीण भागात राहिला आहे. जयसिंगपूर, इस्लामपूर अशा शहरांत संघटनेने नशीब आजमावले, मात्र त्याला तेथे फार मोठे यश आले नव्हते. यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत ते उतरणार आहेत.  

याबाबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, ""समविचारी पक्षांसोबत आम्ही आघाडी करू. तरुण कार्यकर्त्यांना संधी देऊ. स्वच्छ चारित्र्य हाच मुख्य निकष असेल. डॉक्‍टर, इंजिनिअर, वकिल, सामाजिक कार्यकर्ते मैदानात उतरवू. एक वोट, एक नोट या पद्धतीने निधी संकलित करू. पैसे खर्च करणार नाही, पैसे मिळवणार नाही, अशी शपथ घेऊन लढू. खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी हितासाठी आजवर लढा दिला. महापालिका क्षेत्रात आम्ही पहिल्यांदाच उतरत आहोत, कारण इथले राजकारण दुषित झाले आहे. त्याला विरोध केलाच पाहिजे.'' 

Web Title: Sangli News Swabhimani in corporation election