विश्रामबागला फ्लॅट फोडून लाखाचा ऐवज पळविला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

सांगली - विश्रामबाग येथील आश्रय सोसायटीमधील सुमती संस्कार अपार्टमेंटमधील किरण संपतराव सूर्यवंशी (वय 35) यांचा फ्लॅट फोडून चोरट्याने लाखाचा ऐवज लंपास केला. विश्रामबाग पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. 

सांगली - विश्रामबाग येथील आश्रय सोसायटीमधील सुमती संस्कार अपार्टमेंटमधील किरण संपतराव सूर्यवंशी (वय 35) यांचा फ्लॅट फोडून चोरट्याने लाखाचा ऐवज लंपास केला. विश्रामबाग पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. 

अधिक माहिती अशी, की किरण सूर्यवंशी यांचा सुमती संस्कार अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे.  शनिवारी  दुपारी अडीच ते साडेतीन या वेळेत सूर्यवंशी यांचा फ्लॅट बंद होता. या वेळी चोरट्याने फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. देवघरातील लोखंडी कपाट फोडून आतील तीन तोळ्यांचे गंठण, दोन कर्णफुले, सात ग्रॅमची अंगठी, चांदीची समई असा लाखाचा ऐवज घेऊन चोरट्याने पलायन केले. दुपारी साडेतीन वाजता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सूर्यवंशी यांनी विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळवला. रात्री उशिरा याबाबत फिर्याद नोंदवली. 

Web Title: sangli news theft

टॅग्स