हळद, गूळ सौद्यांबाबत तोडगा दृष्टिपथात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

सांगली - जीएसटीच्या पार्श्‍वूीमिवर गेले चाळीस दिवस बंद असलेले हळद, गुळाचे सौदे नियमित सुरू करण्यासाठी सकारात्मक पावले आजच्या बैठकीत घेण्यात आली. यामुळे एक-दोन दिवसांत सांगली बाजार समितीतील व्यापार पूर्ववत होण्यास मदत होणार आहे. 

सांगली - जीएसटीच्या पार्श्‍वूीमिवर गेले चाळीस दिवस बंद असलेले हळद, गुळाचे सौदे नियमित सुरू करण्यासाठी सकारात्मक पावले आजच्या बैठकीत घेण्यात आली. यामुळे एक-दोन दिवसांत सांगली बाजार समितीतील व्यापार पूर्ववत होण्यास मदत होणार आहे. 

जीएसटी लागू केल्यापासून गेले ३९ दिवस व्यापाऱ्यांतील संभ्रमावस्थेमुळे सांगली बाजार समितीतील गूळ, हळदीचे सौदे पूर्णपणे बंद आहेत. आवक आणि विक्रीही ठप्प झाली आहे. हळद, गुूळ विक्रीबाबत सांगली बाजार समितीत बाजार समिती प्रशासन, व्यापारी असोसिएशन आणि अडत्यांची आज दुपारी बैठक झाली. बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ अध्यक्षस्थानी होते. चेंबर ऑफ कॉमर्सचे शरद शहा, सुरेश पाटील, गोपाळ मर्दा, शीतल पाटील, अजित पाटील, बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांच्यासह अडते उपस्थित होते. 

शेतीमालावर जीएसटी कमी-अधिक असली तरी वाहतूक, अडत, हमाली आणि अन्य बाबींवर जीएसटी लागू आहे. तिच्या आकारणीबाबत बैठकीत चर्चा झाली. गेले चाळीस दिवस व्यापार बंद असल्याने बाजार समितीला फटका बसला आहे. दररोज २ कोटींप्रमाणे व्यवहार थांबले आहेत. बेदाण्याची आवक घटली असली तरी सौदे सुरू आहेत. जीएसटीमुळे किरकोळ खरेदी-विक्रीही बंद झाल्याने बाजार समिती आर्थिक अरिष्टात सापडली आहे. व्यवहार कोलमडले आहेत. सध्या धान्य खरेदी-विक्रीचे किरकोळ व्यवहार सुरू आहेत. 

पॉईंटर... 
गूळ रवे - दररोजची आवक २५ ते २७ हजार 
हळद- प्रतिदिन ९ ते १० हजार पोती 
मिरचीसह अन्य धान्य आवक ५० टक्के घटली 

Web Title: sangli news turmeric jaggery auction solution