अग्रणी नदी पात्रात बुडून दोन चुलत भावाचा मृत्यू

विजय पाटील
सोमवार, 28 मे 2018

सांगली - जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव जवळच्या अग्रणी नदीत बुडून दोन चुलत भावाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.. हे दोघेही सावळज गाव येथील आहेत. दिनेश रमाकांत पोतदार (वय 32) आणि अनंतकुमार पोतदार (वय 13) असे या दोघांची नावे आहेत.

अग्रणी नदीकाठी असलेल्या शेतामध्ये हे दोघेजण आले होते. दुपारी तीनच्या सुमारास उकाडा असल्याने ते पोहायला नदीत उतरले. अनंतकुमारला पोंहायला शिकवण्यासाठी दिनेश हे पाण्यात उतरले. पण पोहण्यास शिकत असताना अनंतकुमार बुडायला लागला. तेव्हा दिनेश यांनी त्याला वाचविण्यासाठी त्याच्या जवळ गेले असता अनंतकुमारने त्यांना मिठी मारली. त्यामुळे यात दोघेही बुडाले. ही घटना समजताच तात्काळ नदी पात्रत शोधकार्य राबवून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

Web Title: Sangli News two brothers dead in Agrani River