आटपाडी येथे १५ जुलैला पाणी परिषद

नागेश गायकवाड
गुरुवार, 5 जुलै 2018

आटपाडी - येथील बचत भवन मैदानावर रविवारी (ता.१५) पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांची जयंती आणि इंदुताई पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम होणार आहे. श्रमिकमुक्ती दल आणि पाणी चळवळीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. भारत पाटणकर होते.  

भिंगेवाडी (ता. आटपाडी) येथील कृषी विद्यालयामध्ये श्रमिक मुक्तीदल आणि पाणी चळवळीची बैठक झाली. यावेळी चळवळीचे आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, हणमंतराव देशमुख उपस्थित होते. बैठकीत टेंभूचे आलेले पाणी, राहिलेली कामे, बंद पाईपलाईन प्रस्ताव आदीवर चर्चा झाली. केवळ चळवळीमुळेच टेंभूचे पाणी आले असून बंद पाईपलाईन कामाला गती देण्याच्या दृष्टीने आणि क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी व इंदुताई पाटणकर यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी पाणी परिषद घेण्याचा निर्णय घेतला. रविवार (ता. 15) बचत भवन मैदानावर दुपारी एक वाजता ही पाणी परिषद होईल. दाजी देशमुख, बबनबापू क्षीरसागर, बाळासाहेब यादव, मुरलीधर पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Sangli News water conference in Atapadi