यमाजी पाटीलाचीवाडी प्रथम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

सांगली - संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राममध्ये यमाजी पाटलाचीवाडी (ता. आटपाडी) ने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. ही माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी येथे दिली.

सांगली - संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राममध्ये यमाजी पाटलाचीवाडी (ता. आटपाडी) ने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. ही माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी येथे दिली.

ते म्हणाले, ‘‘ग्रामस्वच्छता अभियानाच्या सुधारित सूचनानुसार समितीने प्रत्येक तालुक्‍यातील प्रथम, द्वितीय क्रमांकाच्या २१ ग्रामपंचायतींची तपासणी चार ते दहा मे दरम्यान केली. यमाजी पाटलाचीवाडीने पाच लाखांचे  प्रथम पारितोषिक पटकावले. नाटोली (ता. शिराळा) ने दुसऱ्या क्रमांकाचे तीन लाखांचे पारितोषिक मिळवले. अंकलखोप (ता. पलूस) व लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) या दोन गावांनी विभागून तृतीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांकासाठी दोन लाखांचे पारितोषिक आहे.’’

श्री. देशमुख म्हणाले,‘‘पाणी व्यवस्थापनाबद्दल स्व. वसंतराव नाईक हा विशेष पुरस्कार वाडीभागाई (ता. शिराळा) व कुटुंब कल्याणसाठी स्व. आबासाहेब  खेडकर पुरस्कार शिरगाव (ता. वाळवा), सामाजिक एकतेबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सावर्डे (ता. तासगाव) ग्रामपंचायतीला मिळाला. तिन्ही गावांना २५ हजारांचे पारितोषिक मिळेल.

यमाजी पाटलाचीवाडीने घर तिथे शोषखड्डे असा उपक्रम राबवून गटरमुक्त गाव असा नावलौकिक मिळवला आहे. गावाने स्वच्छता, डासमुक्तीमध्ये सातत्य राखले आहे. यमाजी पाटलाचीवाडी आणि नाटोली या ग्रामपंचायतीची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तेथे आणि राज्यस्तरावर दोन्ही गावांना यश मिळेल असा विश्‍वास आहे.’’ 

...अन्‌ नांदेड पॅटर्न झाला
यमाजी पाटलाचीवाडीत उपक्रम राबवणारे ग्रामसेवक बदली होऊन नांदेड गेल्यानंतर तिथेही तो पॅटर्न राबवला गेला. सध्या नांदेड पॅटर्न राज्यात राबवला जात आहे, हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

Web Title: Sangli News Yamaji Patilachiwadi First in Gadge Maharaj Abhiyan