बदल हवा, चला स्वत-पासून सुरवात करू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

सांगली  - बदल हवा तर बदलाचाच भाग व्हा. जग ज्या गतीने बदलत आहे, त्याची गती पकडा. चला, स्वत-पासून सुरवात करूया, असे आवाहन आज यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)चे राज्याचे हेड तेजस गुजराथी यांनी केले. यिन-सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचा आज सांगलीतील विविध महाविद्यालयांत प्रारंभ झाला. 

सांगली  - बदल हवा तर बदलाचाच भाग व्हा. जग ज्या गतीने बदलत आहे, त्याची गती पकडा. चला, स्वत-पासून सुरवात करूया, असे आवाहन आज यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)चे राज्याचे हेड तेजस गुजराथी यांनी केले. यिन-सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचा आज सांगलीतील विविध महाविद्यालयांत प्रारंभ झाला. 

"सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर'च्या पुढाकाराने विद्यार्थी आणि विविध समाजघटकांच्या गरजा ओळखून हा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी येथील पतंगराव कदम महाविद्यालय, गणपतराव आरवाडे वाणिज्य महाविद्यालय, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, चिंतामणराव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आदी ठिकाणी सादरीकरण आणि विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम झाला. 

"सकाळ'-कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, सहयोगी संपादक शेखर जोशी, वरिष्ठ व्यवस्थापक उदय देशपांडे यांच्यासह "एसआयएलसी'चे कुणाल क्षीरसागर, डॉ. राम गुडगुली, श्‍याम माडेवार प्रमुख उपस्थित होते. 

श्री. रायकर म्हणाले, ""आजची आव्हाने ही कालची नाहीत. पुढची दहा वर्षे तरुणाईची आहेत. देश महासत्ता व्हावा, अशी आपली प्रत्येकाची अपेक्षा आहे. त्यासाठी कृती कार्यक्रमाची गरज आहे. देशापुढची आव्हानेच तरुणाईपुढची आव्हाने आहेत. कुशल मनुष्यबळाचा विकास हे उद्दिष्ठ ठेवून "सकाळ'ने पुढच्या काळात प्रमुख सात क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. शिक्षण आणि कौशल्य विकास, इम्पॅक्‍ट फंड, माध्यम, सल्ला सेवा, समूह परिवर्तन, इव्हेंटस्‌ आणि विशेष प्रकल्प. यातील कौशल्य विकासाचा भाग म्हणून "एसआयएलसी'सारखी संस्था आहे. "यिन'सारखे व्यासपीठ आता या संस्थेशी जोडले आहे. अंतिमत- समाजाचा विकास हे ध्येय घेऊन सुरू असलेली ही वाटचाल आता गती पकडत आहे. तरुणाईचे हे बळ योग्य दिशेने न्यायचा हा प्रयत्न आहे. गुगल, ऍपल, फ्लिपकार्ट, बीव्हीजीसारख्या कंपन्यांच्या प्रमुखांनी आर्थिक समस्यांचा विचार न करता वाटचाल सुरू केली. ही मंडळी आदर्श म्हणून ठेवाच, मात्र त्यासाठी त्यांनी कोणते नियोजित प्रयत्न केले, हे समजून घेणे गरजेचे आहे. "गुगल'ची संकल्पना दोघांची होती, जी त्यांनी सत्यात उतरवली. तुमच्याकडे असलेल्या कल्पना हेच तुमचे मोठे भांडवल आहे. त्यांचा आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने वापर झाला पाहिजे.'' 

श्री. जोशी म्हणाले, की सामाजिक परिवर्तन हा "सकाळ माध्यम समूहा'चा पाया आहे. लोकांच्या सहभागातून समस्यांची सोडवणूक करण्यासाठी "सकाळ' प्रयत्नशील आहे. "सकाळ'चा सर्व क्षेत्रांतील संचार हेतूपूर्वक आणि निश्‍चित दिशा ठेवून आहे. 

प्रशिक्षणाचा कालावधी व स्वरूप 
बारा महिन्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम 
आठ महिन्यांत व्हिडिओ, वेबिनार्स, असेसमेंट्‌स, स्टडी मटेरिअलच्या माध्यमातून प्रशिक्षण 
एक महिना पूर्णपणे प्रकल्पावर काम किंवा इंटर्नशिप व तीन महिन्यांची स्टार्टअप स्पर्धा किंवा व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण 
लाइव्ह वेबिनार्स, मेन्टॉरशिप, इंटर्नशिप, प्रोजेक्‍ट, इनक्‍युबेशन किंवा सीड फंडिंगच्या माध्यमातून सहभागी होता येणार 
आपल्या मोबाईल अथवा संगणकावर लाईव्ह प्रशिक्षण. ऑफलाईन जाऊन कितीही वेळा त्या लेक्‍चरचा लाभ शक्‍य. 
दर तीन महिन्यांतून प्रत्यक्ष मार्गदर्शकांबरोबर चर्चा-संवाद होणार. 
दरमहा छापील नियतकालिकांद्वारे स्टडी मटेरियल मिळणार. 

प्रशिक्षणाचे वेगळेपण 
सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या सर्व टीमचे पाठबळ 
राज्य व देशस्तरावरील नामवंत कंपन्यांच्या सीईओंची लाईव्ह सेमिनार्स 
दर तीन महिन्यांनंतर ऑनलाईन चाचणी परीक्षा 
प्रशिक्षणाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या संकल्पनांवर राज्यस्तरीय परीक्षा 
काही संकल्पनांसाठी बीज भांडवलाची (आर्थिक पाठबळ) उभारणी 
विद्यार्थी आणि कंपन्यांमध्ये संवाद पुलाची उभारणी करणार 

कोण सहभागी होऊ शकते? 
महाविद्यालये स्वत-च्या विद्यार्थ्यांसाठी 
सहकारी-खासगी बॅंका, पतसंस्था, कारखानदार स्वत-च्या कर्मचाऱ्यांसाठी 
शैक्षणिक संस्था या उपक्रमाचा अंगिकृत भाग होऊ शकतात 

कुठे संपर्क साधाल? 
"सकाळ'च्या विविध संपर्क कार्यालयांमध्ये बातमीदार, कार्यालयीन प्रमुखांकडे नोंदणी करू शकाल. 
संपर्क क्रमांक - विवेक- 7722073044. 

शुल्क 
प्रतिदिन सहा रुपयांप्रमाणे वर्षाचे 2999 रुपये. 

प्राचार्य प्रतिक्रिया  
"सकाळ'च्या "यिन' व्यासपीठाने महाविद्यालयीन स्तरावर राबविलेले उपक्रम दिशादर्शक आहेत. नेतृत्व विकासाची ही दिशा आपल्याला घडवावी लागेल. "सिमॅसिस'च्या या उपक्रमातील अनेक तपशील प्रचलित शिक्षण व्यवस्थेत न सामावणारे आहेत. त्यामुळे विविध विद्याशाखांसाठी ती व्हॅल्यू ऍडिशन ठरेल. 
- डी. जी. कणसे, प्राचार्य,  डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीवाडी 

भविष्यकाळ तरुणाईसाठी मोठ्या संधीचा असेल. मात्र, त्याचे सोने करण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची भूमिका हा ऑनलाईन अभ्यासक्रम पार पाडू शकेल. 
- सुमंत कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक,  भोकरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग, मिरज 

तांत्रिक शिक्षणाला अन्य विविध कौशल्यांची गरज असते. उद्योजक वृत्ती घडविताना अभ्यासक्रमीय मर्यांदाची पूर्तता या कोर्सद्वारे होऊ शकेल. "सिमॅसिस' हा सर्व विद्याशाखांसाठी पुरवणी अभ्यासक्रम ठरू शकेल. 
- डॉ. संपतराव जाधव, सीईओ,  भोकरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग, मिरज 

"सकाळ'च्या या उपक्रमाद्वारे शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये संवाद पूल बांधण्यात आला आहे. अभियांत्रिकी-व्यवस्थापनासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी बाहेर पडतात, तेव्हा यशस्वितेसाठी आणखी काही हवे असते. ते या अभ्यासक्रमामधून मिळेल, असा विश्‍वास वाटतो. 
- जी. व्ही. पारिषवाड, संचालक,  वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय 

"सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर'द्वारे विविध अभ्यासक्रम राबविले जातात. हे सेंटर स्थानिक महाविद्यालयांशी जोडल्यास विविध विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांचा आकलनाचा परिघ विस्तारला जाईल. ऑनलाईन एज्युकेशनचा जगभरातील प्रसार आणि आपल्याकडची स्थिती यातली तफावत मोठी आहे. "सकाळ'चा यातील पुढाकार भविष्यवेधी ठरेल. 
- बिराज खोलकुंबे, संचालक,  डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट 

"सकाळ'ने काळाची पावले ओळखून युवा पिढीसाठी एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. उद्योग, व्यवसाय आणि नोकरी या तिन्हींमध्ये आत्मविश्‍वासाने सामोरे जाताना जगाचे ज्ञान आणि भान देणारी ही वाट आहे. त्याचा तरुणाईने जरूर लाभ घ्यावा. 
- डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्राचार्य,  मथुबाई गरवारे महाविद्यालय 

"सकाळ'ची विविध उपक्रमांतील सामाजिक बांधिलकी सर्वज्ञात आहे. "यिन' व्यासपीठाने महाविद्यालयीन युवकांचे चांगले नेटवर्क निर्माण केले असून, त्यांना रोजगाराची दिशा देणारा पुढाकार "सिमॅसिस'च्या माध्यमातून घेतला जात आहे. 
- एस. एस. शेजाळ, प्राचार्य,  गणपतराव आरवाडे महाविद्यालय, सांगली 

नव्या पिढीसाठी अतिशय उपयुक्त असा हा उपक्रम आहे. विशेषत- अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तर हा अत्यावश्‍यकच ठरेल. शिकत असतानाच उद्यमशीलतेची मूलभूत कौशल्ये विकसित होणे गरजेचे आहे. विविध विद्याशाखांचे विद्यार्थी या माध्यमातून टीम तयार करून भविष्यात उद्योगांमध्ये येऊ शकतील. यातील इंटर्नशिप हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. उद्योजकांचे थेट मार्गदर्शन तर या कोर्सचे वेगळेपण आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. 
- डॉ. व्ही. बी. धर्माधिकारी,  वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय 

ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महाविद्यालयांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि पूरक असा उपक्रम आहे. पुण्या-मुंबईच्या उद्योजकांशी थेट संवाद पूल बांधणारा हा उपक्रम अभ्यासक्रमासाठी आणि महाविद्यालयासाठी गुणात्मक दर्जा वाढविणारा असेल. आमच्या सर्व शैक्षणिक संस्था या उपक्रमाचा भाग असतील. 
- वैभव पाटील, आदर्श 

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया  
चांगला अभियंता, चांगला उद्योजक, चांगला संवादक अशा प्रत्येक टप्प्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकेल, असे वाटते. आमच्या गरजांचा मध्य काढून हा अभ्यासक्रम डिझाईन केला आहे. 
- सर्वेश जोशी, भोकरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग, मिरज 

उद्योग करण्यासाठीची पूर्वतयारी करावी लागते, याची माहिती आजच्या कार्यशाळेतून झाली. "सकाळ'ने काळाची गरज ओळखून प्रत्येक क्षेत्रासाठी योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांसाठी हा दिशादर्शक उपक्रम ठरेल. 
- रवीचंद्र पवार 

सर्वच क्षेत्रांतील लीडरशिप घडणे गरजेचे आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी शोधण्यासाठी अभ्यासक्रम मार्गदर्शक ठरेल. 
- संकेत कांबळे, चिंतामणराव मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट 

उद्योजकता घडविणे ही प्रक्रिया आहे. त्यासाठी पूरक अशी कौशल्ये विकसित व्हायची असतील तर प्रशिक्षण आणि वातावरणाची गरज असते. ही कार्यशाळा अनेक संकल्पनांच्या वाटा दाखविणारी वाटली.'' 
- प्रिया दीक्षित, चिंतामणराव मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट 

उद्योग व्यवसायाच्या अंगभूत प्रेरणांना प्रोत्साहन देणारी कार्यशाळा होती. नोकरी देणारे व्हा, असे सारेच सांगतात. "सकाळ'ने त्यासाठी दिशा दिली. 
- ईश्‍वरी बेडेकर, चिंतामणराव मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट 

हा अभ्यासक्रम मला "कॉन्फिडन्स' देईल, अशी खात्री वाटते. तो मोबाईलवरून घरबसल्या शिकता येणार आहे, त्यामुळे फार त्रास नाही. ऍडव्हान्स पद्धतीने अभ्यासाचीही सवय लागेल. आम्ही सारे याबाबत उत्सुक आहोत. 
- मृण्मयी माळी, गरवारे कन्या महाविद्यालय 

पदवी घेतल्यानंतर काय करायचे, हे निश्‍चित करता येत नाही, हा अनेकांचा "प्रॉब्लेम' आहे. मला वाटते, की या अभ्यासक्रमातून ती दिशा सापडू शकेल. यातली "मेंटॉर'ची संकल्पना खूपच वेगळी वाटली. 
- प्रियांका गोडबोले, गरवारे कन्या महाविद्यालय 

करिअरच्या वाटा शोधण्यासाठी या कार्यशाळेचा फायदा झाला. आम्हाला या ऑनलाईन अभ्यासक्रमाबद्दल कुतूहल आहे. "यिन' व्यासपीठाने दिलेली ही संधी आम्ही नक्की घेऊ. 
- लक्ष्मी पाटील, कदम महाविद्यालय, सांगलीवाडी 

उद्योजक, नोकरीसाठीची पदवी लागते. पण, त्यासोबत कौशल्ये लागतात. करिअरचा शोध कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठीची दिशा मिळावी. 
- रोहित शिंगे, कदम महाविद्यालय, सांगलीवाडी 

यांचा अमूल्य सहभाग 
"सकाळ'च्या या उपक्रमात सहभागी अन्य महाविद्यालये व तेथील प्राध्यापक, संस्थाचालक, प्राचार्य भास्कर ताम्हणकर (विलिंग्डन महाविद्यालय), किशोर पंडित (संचालक, डेक्कन एज्युकेशन सोसायटी), शांतिनाथ कांते, सुहास पाटील (लठ्ठे एज्युकेशन सोसायटी), प्राचार्य रमेश चराटे (लठ्ठे पॉलिटेक्‍निक), प्राचार्य एम. एस. राजपूत (राजपूत कनिष्ठ महाविद्यालय), प्रा. बी. डी. पाटील (पतंगराव कदम महाविद्यालय), प्रताप देसाई (भारती मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट), डी. के. पाटील (वारणा महाविद्यालय, ऐतवडे खुर्द), संभाजी गायकवाड (मिरज महाविद्यालय), रिना चव्हाण (आप्पासाहेब बिरनाळे वास्तुविशारद महाविद्यालय), प्रा. बी. जे. पाटील (वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय).

Web Title: sangli news YIN youth SILC