Sangli : फुले विद्यापीठ करणार कृषी पारायण

‘गदिमा’ जन्मभूमी शेटफळेतून एक ऑक्टोबरला प्रारंभ; दहा जिल्ह्यांतील गावांची निवड
sangli
sanglisakal

आटपाडी : आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या जन्मभूमी शेटफळे (ता. आटपाडी) येथून येत्या एक ऑक्टोबरपासून राज्यातील दहा जिल्ह्यांत कृषी पारायणांचे आयोजन केले आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

‘गदिमा’च्या जयंतीला दरवर्षी साहित्यिकांच्या पारावरचा मेळावा होत असतो. यंदा शेतकरी पारायण घेऊन अनोख्या पद्धतीने जयंती साजरी केली जाणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांत प्रत्येकी एका गावात हा पारायण सोहळा केला जाणार आहेत. त्याची सुरवात १ ऑक्टोबरला शेटफळेतून होणार आहे.

सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नंदूरबार, जळगाव, धुळे आणि नाशिक. या दहा जिल्ह्यांतील एका गावात पारायण सोहळा वर्षभरात होणार आहेत. त्यात कृषी महाविद्यालये, कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, विभागीय विस्तार केंद्राचा मुख्य सहभाग असेल. कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, तंत्रज्ञान विभागाचे कर्मचारीही सहभागी होतील.

sangli
पोलिस कर्मचाऱ्याला गाडीखाली चिरडलं; पाहा व्हिडिओ

गदिमां’च्या जन्मभूमीतून देशातील पहिले कृषी पारायण होईल. एक ऑक्टोबरपासून वर्षभर ही पारायणे होतील. त्यासाठी कृषी शास्त्रज्ञाचे गट तयार केले आहेत. शास्त्रज्ञ-अधिकारी यांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद करण्यात येणार आहे. बांधापर्यंत संशोधन-तंत्रज्ञान पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे. दहा जिल्ह्यांतील दहा गावात पंचक्रोशीतील मध्यवर्ती गावात वर्षभरात हे पारायण होईल.

- डॉ. पी. जी. पाटील,

कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी)

अनेकविध विषयांवर मार्गदर्शन

या कृषी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने विद्यापीठातील शास्त्रज्ञ गावांना भेटी देतील. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अडचणी समजून घेतील. त्यांना एकात्मिक पद्धतीने मार्गदर्शन करतील. गावाची जमीन, हवामान, मुख्य पिके, कृषी प्रक्रिया उद्योग, रिमोट सेन्सिंग तंत्राचा वापर, स्मार्ट शेती, सूक्ष्म सिंचन प्रकार, फळबाग व्यवस्थापन, आधुनिक यांत्रिकीकरण, मूल्यवर्धन, लगतची शहरे, पाण्याचे व्यवस्थापन, मातीचे आरोग्य कसे सुधारायचे, सेंद्रिय शेतीची चौफेर माहिती, शेतीतील खर्च कमी करण्यासाठी उपाय, रासायनिक खतांचा समतोल वापर, जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन व्यवस्थापन अशा अनेकविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com