आमदार गाडगीळ यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे काल प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले होते.
सांगली : ‘निवडणूक न लढण्याचा निर्णय मागे घ्या, सांगलीला तुमची गरज आहे,’ अशा शब्दांत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना साकडे घातले. यावर ‘हा निर्णय मी विचारपूर्वक घेतला आहे, तरीही तुमच्या भावनांचा आदर करून आणि वरिष्ठांशी चर्चा करून फेरविचार करतो,’ अशा शब्दांत आमदार सुधीर गाडगीळ यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला.