
Sangli Politics
esakal
भाजपची इशारा सभा – सांगलीत राष्ट्रवादीच्या सभेला उत्तर देण्यासाठी भाजप १ ऑक्टोबरला ‘इशारा सभा’ घेणार असून, राष्ट्रवादी नेत्यांच्या वक्तव्यांचे व्हिडिओ दाखवून प्रत्युत्तर दिले जाणार, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.
राष्ट्रवादीवर हल्ला व प्रत्युत्तराची तयारी – शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल मिटकरी यांच्यावर वक्तव्य करत पाटील यांनी वारकरी समुदायाच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित केला आणि “अंगावर आले तर शिंगावर घेऊ” असे सांगत भाजपच्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.
पडळकरांना कानपिचक्या – व्यासपीठावरच चंद्रकांत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकरांना मर्यादा पाळण्याचा सल्ला देत, “नेत्यांवर बोला पण त्यांच्या कुटुंबावर बोलू नका” अशी ताकीद दिली.
Sangli Politics BJP : भाजपने नेहमीच संयम ठेवून राजकारण केले आहे, मात्र आता अंगावर आलेच आहेत, तर शिंगावर घेऊ. त्यांनी सांगलीत जी सभा घेतली, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप येत्या १ ऑक्टोबर रोजी इशारा सभा घेईल. विकृतीचा रावण आपण जाळू. त्यात शरद पवारांपासून ते सुप्रिया सुळे आणि अमोल मिटकरींपर्यंत कुणाची जीभ कशी घसरली होती, याचा व्हिडिओ लावला जाईल, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिला.