
Sangli Politics
esakal
कार्यकर्त्यांना प्राधान्याचा ग्वाही – आमदार विश्वजित कदम यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा निर्णय स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा विचार करूनच होईल, अशी ग्वाही दिली.
रणनितीवर चर्चा – शासकीय विश्रामगृहात झालेल्या तालुका काँग्रेसच्या बैठकीत निवडणुकीची रणनिती, स्थानिक राजकीय समीकरणे, कार्यकर्त्यांची मते आणि पक्षसंघटना मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
सर्वतोपरी मदतीचे आश्वासन – खासदार विशाल पाटील यांनी उमेदवारांना निवडणुकीत सर्वतोपरी मदत व कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आश्वासन दिले.
Sangli Politics News : कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा निर्णय होईल, अशी ग्वाही आमदार विश्वजित कदम यांनी कार्यकर्त्याच्या बैठकीत दिली. येथील शासकीय विश्रामगृहात तालुका काँग्रेसची बैठक झाली. खासदार विशाल पाटील उपस्थित होते. निवडणुकांची रणनिती, कार्यकर्त्यांची मते, स्थानिक राजकीय समीकरणांचा आढावा आणि पक्षसंघटनेच्या मजबुतीबाबत आज चर्चा झाली.