Sangli Robbery : बेडरूमला लावली कडी, चोरट्यांनी लुटली तिजोरी; सांगलीत जबरी जोरीने खळबळ

Sangli Robbery Thieves : चोरट्यांनी तब्बल तेरा तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी आणि दोन लाखांची रोकड असा साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
Sangli Robbery

Sangli Robbery

esakal

Updated on
Summary

घटना – विजयनगर-वानलेसवाडी येथील खताळनगरमधील प्रा. अशोक कांबळे यांच्या बंगल्यात मध्यरात्री चोरट्यांनी घुसून कुटुंबीयांना बेडरूममध्ये बाहेरून कडी लावली व दुसऱ्या बेडरूममधील तिजोरी फोडली.

मालमत्ता – चोरट्यांनी १३ तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी व २ लाख रुपये रोकड असा सुमारे दहा लाखांचा ऐवज लंपास केला.

तपास – संजयनगर पोलिसांनी ठसे तज्ज्ञ, श्वानपथकासह घटनास्थळी पाहणी केली असून पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी अधिक तपास करत आहेत.

Sangli Crime News : बंगल्यात कुटुंब झोपले होते. मध्यरात्री चोरटे आले. हॉलच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. त्यावेळी बेडरूममध्ये झोपलेल्यांना बाहेरून कडी लावली. त्यानंतर दुसऱ्या बेडरूमधील तिजोरीवर चोरट्यांनी हात साफ केला. विजयनगर येथील खताळनगरमध्ये घडली. चोरट्यांनी तब्बल तेरा तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी आणि दोन लाखांची रोकड असा साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी प्रा. अशोक विष्णू कांबळे यांनी फिर्याद दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com