शुक्रवारी सांगली सकाळचा वर्धापन दिन : जयंती कठाळे यांचा संवाद ऐकण्याची संधी....

Sangli Sakal 36 Anniversary Celebration Sangli Marathi news
Sangli Sakal 36 Anniversary Celebration Sangli Marathi news

सांगली : दैनिक 'सकाळ'च्या सांगली विभागीय कार्यालयाचा 36 वा वर्धापनदिन साजरा होत आहे. "पूर्णब्रह्म' या हॉटेल चेनच्या माध्यमातून महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ जगात नेण्याचा ध्यास घेतलेल्या सौ. जयंती कठाळे यांचा मुक्त संवाद, वाचकांचा स्नेहमेळावा, उल्लेखनीय कार्याबद्दल समाजातील विविध संस्था-व्यक्तींचा सत्कार या कार्यक्रमांसह यानिमित्ताने "बदलते गाव...बदलते कुटुंब' असा संग्राह्य विशेषांक प्रकाशित होत आहे. 

वर्धापनदिन आणि त्यानिमित्ताने मान्यवर वक्‍त्यांचा संवाद, संग्राह्य विशेषांक ही 'सकाळ' ची परंपरा पुढे नेणारा यंदाचा उत्सव असेल. येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सायंकाळी साडेपाच वाजता जयंती कठाळे यांचा मुक्तसंवाद सुरू होईल. स्वतःचा जीवनप्रवास मांडतानाच त्या बदलत्या जगातील करिअरच्या संधीविषयी भाष्य करतील. महाविद्यालयीन युवक-युवती आणि उद्योगाच्या नव्या वाटांच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी ही संवाद पर्वणी असेल. 


जयंती कठाळे यांच्या सोबत
समाजातील चांगल्याच्या मागे आपल्या लेखणीतून बळ उभे करणाऱ्या 'सकाळ' ने वर्धापनदिनाच्या निमित्ताने अशा काही प्रातिनिधिक व्यक्ती, संस्थांचा सत्कार करण्याचे व्रत सुरू ठेवले. यंदा मालवाहू टेंपो चालवत संसाराचा गाडा हाकणाऱ्या नकुसा मासाळ, मित्राच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला कर्जमुक्तीसाठी एकत्र आलेल्या शिक्षक मित्रांच्या इरादा सामाजिक संस्थेचा, सायकल चळवळीला प्रोत्साहन देणाऱ्या इस्लामपूरचे जायंटस्‌ ग्रुप, कर्नाळचा रोड स्पीन सायकल ग्रुप, तलवारबाजीत राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणारी राधिका आवटी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

'बदलते गाव...बदलते कुटुंब'
 'सकाळ' च्या वर्धापनदिनानिमित्त सर्व स्तरातील वाचकांचा स्नेहमेळावा होत आहे. विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय व्यक्तींचा जणू हा मेळावाच असतो. सौ. कठाळे यांच्या मुक्तसंवादानंतर या स्नेहमेळाव्यास प्रारंभ होईल. त्यासाठीही सकाळ परिवारच्यावतीने आग्रहाचे निमंत्रण आहे. 

ग्रामीण भागाचे बदलते अंतरंग उलगडणार
यावर्षी 'सकाळ' च्या विशेषांकाचा विषय 'बदलते गाव...बदलते कुटुंब' असा आहे. यानिमित्त ग्रामीण भागाचे बदलते अंतरंग उलगडतानाच त्याच्या बऱ्या-वाईट परिणामांची दखल विविध क्षेत्रातील जाणते घेत आहेत. हे सारे लेखन समाजशास्त्रीय अभ्यासकांसाठी उपयुक्त असेच आहे. 'सकाळ' च्या संग्राह्य विशेषकांची परंपरा पुढे नेणारा असा हा अंक आहे. नेहमीप्रमाणेच 'सकाळ' चे सर्व वाचक त्याचे स्वागत करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com