"सकाळ'वर शुभेच्छांचा वर्षाव 

sangli sakal anniversary
sangli sakal anniversary

सांगली ः सांगलीच्या विकासात्मक वाटचालीत गेली 36 वर्षे जागल्याची भूमिका बजावणाऱ्या आणि त्यात कृतीशील पुढाकार घेणाऱ्या "सकाळ' सांगली कार्यालयाच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वाचक, हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात रंगलेला स्नेहमेळावा महाराष्ट्रात नंबर वन असलेल्या "सकाळ'च्या स्नेहीजणांचा कौटुंबिक आनंदसोहळा ठरला. यानिमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या "बदलतं गाव, बदलतं कुटुंब' या विशेषांकाचे जिल्ह्यात भरभरून स्वागत करण्यात आले. 

"सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार, सरव्यवस्थापक उमेश पिंगळे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, निवासी संपादक निखील पंडीतराव, सहयोगी संपादक शेखर जोशी, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे यांनी मान्यवरांच्या शुभेच्छा स्विकारल्या. केवळ वर्तमानपत्र न राहता "सकाळ' एक माध्यम समूह म्हणून लोकांच्या मनात रुजला आहे. त्याचे चित्र यानिमित्ताने दिसले. सर्वांचे स्वागत करणारी आकर्षक कमान, सुरेख रांगोळी, पेढ्यांनी होणारे स्वागत, गरमागरम दूध आणि सोबत गप्पा असा छान माहोल जमून आला होता.

"सकाळ'ने नव्या वर्षात सुरु केलेली विविध वाचनिय सदरे, त्यातील मजकूराचा लक्षवेधी कोलाज वाचकांना भावला. जत तालुक्‍यात कर्नाटकातून पाणी आले पाहिजे, यासाठी "सकाळ'ने गेली 11 वर्षे केलेल्या प्रयत्नांची साक्ष डिजीटल कोलाज देत होता. या साऱ्यात सामान्य वाचकांनी लावलेली हजेरी आणि "सकाळ'वर दाखवलेले प्रेम अतुलनियच. 


खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, सदाशिवराव पाटील, प्रा. शरद पाटील, नितिन शिंदे, कॉंग्रेस नेते विशाल पाटील, शिवसेना नेते दिगंबर जाधव, शेखर माने, कुस्तीगीर महासंघाचे उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते, जनसुराज्य शक्तीचे समीत कदम, शिवसेना माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, सभापती जगन्नाथ माळी, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, भाजप उपाध्यक्षा नीता केळकर

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिजित राऊत, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, अप्पर पोलिस अधिक्षक मनीषा दुबुले, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, सरकारी वकिल उल्हास चिप्रे, ऍड. प्रमोद भोकरे, पोलिस उपाधिक्षक संदिपसिंह गिल, जीएसटी विभागाचे सहायक आयुक्त किशोर गोयल, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर, अधीक्षक होनगौडर, जि.प. शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, निरिक्षक अजय सिंदकर, अनिल तनपुरे, सहाय्यक निरिक्षक अतुल निकम, संदीप क्षीरसागर, निरज उबाळे, डॉ. विनोद परमशेट्टी, सांगली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, मानसिंग बॅंकेचे संस्थापक जे. के. जाधव, मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष ऍड. उत्तमराव निकम, ए. डी. पाटील, मराठा सेवा संघाचे किरण पाटील, शिक्षक समितीचे नेते विश्‍वनाथ मिरजकर, राज्य कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड, शिक्षक संघाचे नेते विनाकयराव शिंदे, नगरसेवक विनायक सिंहासने, गजानन मगदूम, विजय घाडगे, मंगेश चव्हाण, उत्तम साखळकर, ऍड. स्वाती शिंदे, विष्णू माने, सागर घोडके,

उद्योजक गिरीश चितळे, मेघना कोरे, किरण तारळेकर, श्रीकांत तारळेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर, डॉ. उज्वला परांजपे, प्रा. वैजनाथ महाजन, भिमराव धुळुबुळ, लता ऐवळे, दयासागर बन्ने, "बिग बॉस फेम' अभिजित बिचुकले, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर वि. द. बर्वे, ऍड. अमित शिंदे, नारायण देशपांडे, के. जी. पठाण, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, अण्णासाहेब उपाध्ये, रामकृष्ण चितळे, संजय ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष संजय भोकरे, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उत्तमराव पाटील, नजरुद्दीन नायकवडी, विष्णू शिंदे, रवींद्र आरते, दत्ता पाटील, राजू माळी, संजू माळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. 

दूरध्वनीवरून शुभेच्छा 

माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सुमन पाटील, पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर, उद्योजक भालचंद्र पाटील, रोहित पाटील, कोल्हापूर मनपा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी आदींनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com