
सांगली : लग्नाच्या आमिषाने पीडित तरुणीशी चार वर्षे शारीरिक संबंध ठेवून दोन अपत्ये झाली तरी लग्न न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडितेने संशयित अमित प्रल्हाद कांबळे (वय ३६, सैनिकनगर, वानलेसवाडी) याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.