
Farmers Oppose Shaktipeeth Highway : तासगाव तालुक्यातील वज्रचौंडे येथील शक्तिपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी आज बंद पाडली. यावेळी पोलिस आणि शेतकऱ्यांच्या मध्ये किरकोळ वादावादी झाली. मोजणी अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी, ‘आमची मोजणी करायचीच नाही,’ असा निर्धार व्यक्त केला. ‘सांगली जिल्ह्यात मोजणी होऊ देणार नाही, रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील मात्र शक्तिपीठ होऊ देणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, किसान सभेचे कॉ. उमेश देशमुख यांनी दिला.