

Gunfire In Sangli : मिरजेतील निखिल कलगुटगी या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटकीवर आज मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला. पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. पीएसआय दत्तात्रय पुजारी आणि हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून एक बंदुक आणि एक कोयता जप्त केला. दरम्यान अन्य तीन हल्लेखोर त्या ठिकाणाहून पळून गेले. या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली आहे.