सांगली जुन्या दुकानदाराला परवाना नको

नवेखेडला ग्रामस्थांची ‘महसूल’, ‘पुरवठा’कडे मागणी
रास्तभाव धान्य दुकान
रास्तभाव धान्य दुकानsakal

नवेखेड : येथील स्वस्त धान्य दुकान परवाना निलंबित केलेल्या दुकानदारास देऊ नये, अशी गावची मागणी असताना प्रशासनाने ते दुकान पुन्हा जुन्या दुकानदारास चालवण्यास देण्याचा घाट घातला आहे. त्याचे गौडबंगाल काय, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

नवेखेडला अविनाश महादेव चव्हाण यांचे परवाना असलेले स्वस्त धान्य दुकान होते. माल वेळेत न वाटणे, दप्तर अद्ययावत न ठेवणे या कारणांवरून पुरवठा विभागाने परवाना दोन वर्षांपूर्वी निलंबित केला होता. मसूचीवाडी येथील वसंत खोत या दुकानदाराकडे ते धान्य वाटपाची जबाबदारी दिली होती.

सरकारी सुविधा ही अनेक वेळा बदनाम झालेली असते. त्यात स्वस्त धान्य दुकानही आले. खोत याने समज खोटा ठरवत येथे दोन वर्षे धान्य वाटपासाठी आदर्श प्रणाली राबवली. त्याबद्दल लोकांत समाधान आहे. लोकांची त्यांच्यावर कोणतीही तक्रार नाही. तरीही महसूल प्रशासनाने जुने दुकानदार अविनाश चव्हाण यांना परवाना पुन्हा देण्याचा घाट घातला आहे. हे समजताच लोकांनी एकत्र येत ग्रामसभा घेतली. ग्रामसभेत जुन्या दुकानदारास परवाना देऊ नये, असा ठराव केला. तो ‘पुरवठा’ व ‘महसूल’ला पाठवण्यात आला. त्याचा परिणाम पुरवठा विभागावर झाला नाही. त्यांनी अविनाश चव्हाण यांना धान्याचा ट्रक पाठवला. हे समजताच गावातील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी नवेखेड-वाळवा रस्त्यावर ठिय्या मारला. धान्य घेऊन येणारा टेम्पो मात्र आलाच नाही.

लोकभावनेची कदर न करता प्रशासन मुद्दा रेटत आहे, हेच सिद्द होत आहे. जुन्या दुकानदाराने तांत्रिक त्रुटींची पूर्तता करून राजकीय वजन वापरून पुन्हा विक्री परवाना मिळवल्याची चर्चा आहे. प्रशासनाने लोकभावनेचा विचार करणे गरजेचे आहे. पुरवठा विभागाने फिल्डवर जाऊन याची शहानिशा करणे आवश्यक आहे.

मतदानाची महिलांची मागणी

ग्रामस्थांचा प्रखर विरोध असताना तो डावलून पुरवठा विभाग पुन्हा जुन्या धान्य दुकानदारास परवाना देत आहे, हे चुकीचे आहे. दारूबंदीप्रमाणे आमचे मतदान घ्या, अशी मागणी महिलांनी केली आहे.

राज्यमंत्र्यांनी असा आदेश कसा दिला?

आयुक्तांचा निर्णय विरोधात असताना प्रत्यक्ष गावात त्याच्या बाबतीत लोक आक्रमक असतील तर तत्कालीन राज्यमंत्र्यांनी असा आदेश कसा दिला? आणि हे गाव दस्तुरखुद्द जयंत पाटील यांच्या मतदार संघात असताना याचीच चर्चा सुरू आहे.

संबंधित दुकानदाराने आयुक्तांकडे अपील केले. तो निर्णय त्यांच्या विरोधात गेला. पुढे त्यांनी तत्कालीन पुरवठा राज्यमंत्र्यांकडे अपील केले. तो निर्णय त्या दुकानदाराच्या बाजूने आहे.

-बाळासाहेब सवदे, पुरवठा अधिकारी, इस्लामपूर

जुन्या दुकानदाराला परवाना देणार असाल तर नवेखेडचे आम्ही ग्रामस्थ या दुकानावर बहिष्कार घालू.

-लता गायकवाड, स्वाभिमानी महिला आघाडी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com