आषाढीवारीसाठी सांगली आगरातून जाणार 157 बसेस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

18 ते 30 जूलैय पर्यंत नियोजन ः वारकऱ्यांसाठी आरक्षण सुविद्या   

18 ते 30 जूलैय पर्यंत नियोजन ः वारकऱ्यांसाठी आरक्षण सुविद्या   

सांगली: श्री क्षेत्र पंढरपूर येथे 23 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन विभागाने तीन हजार 781 एसटी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. 18 ते 30 जूलै या दरम्यान विशेष एसटी गाड्या सोडल्या जाणार आहेत.
सांगली जिल्ह्यातील सर्व आगारातून 157 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांसाठी आगावू आरक्षण, सुविधा मिळणार आहेत. पंढरपुर येथे ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.  आषाढ महिना आजपासून सुरु झाला. आळंदीसह विविध ठिकाण, गावागावातून जाणाऱ्या दिंड्या पंढपुरच्या दिशेने निघाल्या आहेत. आषाढी एकादशी 23 जुलै आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरला जातात.

राज्य परिवहन मंडळाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी यंदा 18 ते 30 जूलै दरम्यान विशेष एसटी गाड्यांचे नियोजन केले आहे. यासाठी सुमारे आठ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली जाणार आहे. सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर आगारातून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी पंढरपूरच्या बसस्थानकांवर पिण्याचे पाणी, विद्युत सेवा, फिरती स्वच्छतागृहे, उपहारगृह, रुग्णवाहिका, चौकशी कक्ष, संगणकीय उद्‌घोषणा कक्षाची सोय केली आहे. दिवसेंदिवस पंढरपूरच्या पांडूरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी वाढतच आहे. एसटीच्या उत्पन्नापेक्षा वारकरी सेवा महत्त्वाची मानून प्रवाशांना जास्तीत-जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दखळ घेतली जात आहे.

ठळक बाबी...
0 विठ्ठल सहकारी कारखाना बसस्थानकापर्यंत जाण्यासाठी विशेष गाड्या 
0 प्रवाशांसाठी बसस्थानकांवर सर्व अत्यावश्‍यक सोयी-सुविधा 
0 वृध्द, अबाल व स्त्रीयांसाठी दहा टक्‍के आगाऊ आरक्षणाची सोय 
0 वारकऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन जागेवरच मिळणार आरक्षण 
0 गर्दीवरील नियंत्रणासाठी बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे

अशा राहणार जादा बसेस 
जिल्ह्यातून प्रत्येक आगारनिहाय नियमित आणि जादा जाणाऱ्या बसची संख्या अशी- सांगली आगार- 3 व 15, मिरज- 12 व 23, इस्लामपूर- 4 व 8, तासगाव- 1 व 8, विटा- 1 व 20, जत- 4 व 9, आटपाडी- 4 व 11, कवठेमहांकाळ 4 व 15, शिराळा 5 व 28, पलूस 0 व 10 अशा जादा बस सोडण्यात येणार आहेत. 

Web Title: Sangli st depot to get 157 buses to pandharpur