एसटीचे चाक थांबले | Sangli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली : एसटीचे चाक थांबले...

सांगली : एसटीचे चाक थांबले; प्रवाशांचे हाल

सांगली : एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी कृती समितीने सुरु केलेल्या आंदोलनाला एसटी कर्मचार्‍यांनी पाठिंबा देऊन कामबंद केले. त्यामुळे एसटीचे चाक जागेवरच थांबले आहे. अचानक एसटी बसेस जागेवर थांबल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरु झाले.

एसटी कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे, परंतू शासनाने जुलै २०१८ पासून वेळोवेळी जाहीर केलेला महागाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आला नाही. तो फरकासह द्यावा, एसटी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता सध्या ७ व १४ टक्के मिळत आहे. शासनाने ८, १६ आणि २४ टक्के अशी वाढ जाहीर केली असून त्याचा लाभ मिळावा.

वेतनवाढीचा दर एसटी कर्मचाऱ्यांसाठी दोन टक्के असून तो तीन टक्के मिळावा. सणासाठी कर्मचाऱ्यांना दहा हजार उचल मिळते. कामगार करारात मंजूर केल्याप्रमाणे १२ हजार ५०० रूपये उचल मिळावी. तसेच दिवाळीपूर्वी १५ हजार रूपये भेट मिळावी. प्रत्येक महिन्यात वेळेवेर वेतन मिळावे या मागण्यासाठी राज्यभरात कृती समितीने कालपासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे.

हेही वाचा: सिंधुदुर्ग : केंद्राचे धोरण सामान्यांना उद्‍ध्वस्त करण्याचे

सांगलीत विभागीय कार्यालयासमोर कृती समितीच्या वतीने एसटी कामगार संघटना, एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक), एसटी कामगार सेना आदी संघटनेचे पदाधिकारी यांनी उपोषणास प्रारंभ केला आहे.

दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी काल झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज राज्यभरातील कर्मचार्‍यांनी कामबंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे एसटीचे चाक जागेवरच थांबले. ज्या गाड्या मार्गस्थ होत्या, त्या मुक्कामाच्या ठिकाणी पाठवल्या. एसटीचे चाक थांबल्यामुळे विविध स्थानकावर प्रवासी अडकून पडले. वडापचा त्यांना आधार घ्यावा लागला.

सांगलीत आज आंदोलनस्थळी कर्मचार्‍यांनी निदर्शने केली. अशोक खोत, डी.पी. बनसोडे, युवराज शिंदे, नारायण सूर्यवंशी, विजय चौगुले, प्रवेश हंकारे, शमू मुल्ला आदी पदाधिकारी व सदस्य आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Paschim maharashtra
loading image
go to top