Sangli News : सांगलीत गळीत हंगामाला वेग! १५ कारखाने सुरू; तब्बल १२.९७ लाख टन उसाचे गाळप, क्रांती कारखाना सर्वांत पुढे
Sugar Crushing Starts : साखरेचा उतारा ८.८२ टक्के आहे. कुंडल येथील क्रांती कारखान्याने सर्वाधिक उसाचे गाळप करून सर्वाधिक साखर उत्पादन नोंदवले आहे. येत्या पंधरवड्यात पूर्ण क्षमतेने गाळप सुरू होण्याची शक्यता आहे.
सांगली: जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामाला गती आली आहे. पंधरा साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. १२ लाख ९७ हजार १९० टन उसाचे गाळप करून ११ लाख ४४ हजार २५२ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.