सांगलीत "त्या' कोरोना रुग्णांवर होणार घरातच उपचार

jaysing kumbhar
Thursday, 23 July 2020

सांगली : रॅपीड ऍन्टीजेन चाचणी पॉझिटीव्ह ठरलेल्या मात्र लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना यापुढे त्यांच्या घरातच विलगीकरणात ठेवून उपचार करण्यात येणार असल्याचे आयुक्त नितिन कापडणीस यांनी सांगितले. महापालिकेच्यावतीने सध्या रॅपिड ऍन्टीजेन चाचण्या करण्यात येत असून काल रात्रीपर्यंत झालेल्या 666 चाचण्यांमध्ये 22 जण पॉझिटीव्ह आढळले होते.

या चाचण्या प्रामुख्याने ज्येष्ठ व संशयितांच्या केल्या जात असून अशा पाच हजार चाचण्या शहरात टाळेबंदीच्या काळात होणार आहे. त्यातून कोरोनाच्या नेमक्‍या प्रसाराचा प्रशासनाला अंदाज बांधता येणार आहे. बहुतांशी रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच दिसत नसून चाचणीअंती शरीरात ऍन्टी बॉडीज (प्रतिपिंड) सापडत आहेत. त्यामुळे ते कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट होते. तथापि अशा अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची प्रचलित लक्षणेच दिसत नाहीत. देशस्तरावरही हेच चित्र असल्याचे आयसीएमआरच्यावतीने यापुर्वीही स्पष्ट करण्यात आले आहे. दिल्ली शासनाने हाच निर्णय घेत ज्यांच्याकडे घरातच अलगीकरणाची सोय आहे अशा रुग्णांना त्यांच्याच घरात वेगळे ठेवून शासनाच्यावतीने उपचार करण्यात येत आहे. आज आयुक्त नितिन कापडणीस यांनीही यापुढे अशा रुग्णांना घरातच उपचार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. लक्षणे तीव्र आढळल्यास त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये स्थलांतरीत केले जाईल. दरम्यानच्या काळात अशा रुग्णांना आशा वर्कर्सच्या माध्यमातून उपचार दिले जातील.
.......

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Sangli, "those" corona patients will be treated at home