सांगलीला आलात तर इथं नक्की फिरायला जा; चांदोली एक आकर्षक पर्यटन ठिकाण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

सांगली-कोल्हापूर-सातारा-रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमेवरील एक निसर्गरम्य आल्हादायक ठिकाण म्हणजे चांदोली.

सांगली: सांगली-कोल्हापूर-सातारा-रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमेवरील एक निसर्गरम्य आल्हादायक ठिकाण म्हणजे चांदोली. येथे वारणा नदीवर धरण आहे आणि हा परिसर राष्ट्रीय अभयारण्य म्हणून प्रसिद्ध  आहे. तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो. वाघ, बिबट्या, काळवीट, हरिण, गवे, सरपटणारे प्राणी आणि दुर्मिळ वनश्री अशी वनसंपदा येथे पहायला मिळते. 

चांदोली अभयारण्यात जाण्याचा मार्ग  
- कराडवरून शेडगेवाडी फाटा, तेथून आरळा आणि सरळ वारणावती व चांदोली. 
- कराडहून जुळेवाडीमार्गेही जाता येते. 
- कोकणातून येत असाल तर मलकापूरहून लाव्हळे फाट्यावरून कच्च्या रस्त्याने जाता येते. 
- रत्नागिरीहून संगमेश्वर आणि तिथून नायरी गावापर्यंत पायवाटेने प्रचितगडावर जाऊन अभयारण्यात पोहोचता येते. 
-सोलापूर-नागपूर या भागातून येणाऱ्यांसाठी सांगलीतून इस्लामपूरमागे चांदोलीस जाता येते. 

चांदोलीत पाहण्यासारखे काय? 
-आता काही खासगी व्यावसाईकांनी जंगल सफारीचीही सोय केलेली आहे. 
- चांदोली धरण, वीजनिर्मिती केंद्र, वारणा नदीचा उगम 
- खुंदलापूर (धनगरवाडा) हे जुने व जंगलाच्या सीमेवरील गाव 
- राष्ट्रीय अभयारण्यातील मुबलक वनसंपदा 

कुठे रहावे 
- चांदोलीत रिसॉर्ट आहेत. त्यां ठिकाणी निवास व भोजन व्यवस्थेसाठी उत्तम पर्याय आहे. अभयारण्याच्या प्रवेश व्दारापासून काही अंतरावरच ते आहे. 
- वारणावती गावातही भोजन व निवासाची सोय आहे. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Tourism Chandoli Sanctuary information