सांगली : उमाजी नाईक जयंतीनिमित्त मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

सांगली : उमाजी नाईक जयंतीनिमित्त मेळावा

आष्टा : रामोशी समाजाचे विविध प्रश्न शासनदरबारी प्रलंबित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देतानाच सध्याच्या सरकारचे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पाहिले तर गेलेले महाविकास आघाडीचे सरकार लवकरच परत येईल, अशी आशा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

येथे नाईक ग्रुपच्या वतीने नरवीर उमाजी नाईक जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात श्री. पाटील बोलत होते. आयोजक अंकुशराव मदने, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, माजी नगराध्यक्ष स्नेहा माळी, दिलीपराव वग्याणी, माणिक शेळके, संग्राम फडतरे, रघुनाथराव जाधव, सारिका मदने प्रमुख उपस्थित होते. अंकुश मदने, उदय मोटकट्टे, सुरेश मोटकट्टे यांनी समाजाच्या मागण्यांचे निवेदन जयंत पाटील यांना दिले.

पाटील म्हणाले, ‘‘नरवीर उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध पहिले बंड केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सत्तेत वाटाड्या, गुप्तहेर अशा महत्त्वाच्या ठिकाणी समाजातील लोकांनी काम केले. रामोशी समाजाचे मराठी मुलखावर उपकार आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून जागेचा प्रश्न मार्गी लागेल त्या दिवशी येथील समाजासाठी मंदिर व मंडपाचा विषय मार्गी लावू.’’

शिंदे म्हणाले, ‘‘समाजातील गट, गटबाजी संपवून एकत्र या विकासकामांसाठी समाजाची एकजूट महत्त्वाची असते. विलासराव शिंदे यांनी या भागातील प्रत्येक नागरिकाला घरकुल देऊन समाजाचा विकास साधला आहे.’’

झुंजारराव पाटील म्हणाले, ‘‘रामोशी समाजाचे स्थानिक प्रश्न पालिकेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अंकुश मदने यांना ताकद देऊ.’’

धैर्यशील शिंदे, विराज शिंदे, अर्जुन माने, माणिक शेळके, विजय मोरे, प्रदीप ढोले, सतीश माळी, प्रतिभा पेटारे, नितीन झंवर, तानाजी सूर्यवंशी, उदय मोटकट्टे, अशोक मोटकट्टे, जगन्नाथ बसगडे, दिगंबर हिप्परकर, सयाजी गावडे, शशिकांत भानुसे उपस्थित होते.