सांगली अप्पर तहसील कार्यालयामुळे चांगली सेवा मिळेल 

Sangli Upper Tehsil Office will provide better service
Sangli Upper Tehsil Office will provide better service


सांगली : मिरज तालुक्‍यातील सांगली शहर आणि पश्‍चिम भागातील 31 गावांसाठी स्वतंत्रपणे निर्माण करण्यात आलेल्या अप्पर तहसीलदार कार्यालयामुळे लोकांना अधिक चांगली सेवा मिळेल असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज केले. त्यांच्या हस्ते सांगलीतील नूतन अप्पर तहसीलदार कार्यालयाचे उद्‌घाटन आज झाले. अध्यक्षस्थानी खासदार संजय पाटील होते. 


राजवाड्यातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्यात आले आहे. यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार डी. एस. कुंभार, अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते. 


पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, मिरज तालुक्‍यातील गावांची संख्या जास्त आहे. सांगली शहराच्या पुर्व आणि पश्‍चिम भागात तालुक्‍याचा विस्तार असल्याने सांगली शहरासह पश्‍चिम भागातील 31 गावांसाठी मिळून अप्पर तहसीलदार कार्यालय सुरु केले आहे. यामुळे लोकांना अधिक चांगली सेवा मिळेल. 

अप्पर तहसील कार्यालयाचे स्वागत 
आमदार सुधीर गाडगीळ यांनी सन 2014 पासून या कार्यालयाबाबत सातत्याने पाठपुरावा केला. भाजपच्या काळात या कार्यालयास मान्यता मिळाली. तर महाविकास आघाडीच्या काळात कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी त्याला मुर्त स्वरुप येवून कार्यालय अस्तित्वात येण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे हे कार्यालय आपल्यामुळे झाल्याचा श्रेयवाद भाजप तसेच कॉंग्रेसकडून केला जात आहे. यावर बोलताना पालकमंत्री जयंत पाटील यांनी, "मी जनता आहे, त्यामुळे मी आलेल्या अप्पर तहसील कार्यालयाचे स्वागत करतो, असे उत्तर देत श्रेयवादावर बोलण्याचे टाळले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com