Renavi Ghat ST bus accident latest update
esakal
विटा (जि. सांगली) : विजापूर- गुहागर राष्ट्रीय महामार्गावर विट्याजवळील रेणावी घाटात गुरुवारी (ता. १३) दोन एसटींच्या धडकेत झालेल्या अपघातातील जखमी महाविद्यालयीन विद्यार्थिनी साक्षी चंद्रकांत पवार (वय १७, ऐनवाडी, ता. खानापूर) हिचा काल उपचारादरम्यान विट्यातील खासगी रुग्णालयात मृत्यू (Sangli ST Bus Accident) झाला. काल (ता. १३) झालेल्या या अपघातात नंदाबाई हरिदास त्रंबके (६०, खानापूर) व धोंडिराम लक्ष्मण पाटील (७८, बांबवडे, जि. सातारा) हे जागीच ठार झाले होते. साक्षी हिच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागला होता.