

Sangli Water Storage 39 Reservoirs Filled
sakal
सांगली: यंदाच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांमध्ये तब्बल ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांपैकी ३९ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत, तर १३ प्रकल्पांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यात समाधानकारक पाणीस्थिती निर्माण झाली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्के अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.