
Weather Alert Sangli
esakal
सांगली जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले; ४० रस्त्यांवर वाहतूक ठप्प आणि नाले तुडुंब भरले.
ग्रामीण भागात ३५० हून अधिक घरांची पडझड, पशुधनाचे नुकसान; वलवण (आटपाडी) येथे भिंत पडून सात शेळ्या दगावल्या.
कोयना व वारणा धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Sangli Weather Alert : सांगली जिल्ह्यात धुवाधार पावसाने शनिवारी (ता. २७) दाणादाण उडवली. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. महापालिका क्षेत्रासह तासगाव, मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यांच्या वीस मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील ४० रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. ग्रामीण भागातील साडेतीनशेहून अधिक घरांची पडझड झाली असून, आटपाडी तालुक्यात वलवणमध्ये भिंत पडल्याने सात शेळ्या दगावल्या. महापालिका क्षेत्रालाही दिवसभर पावसाने झोडपून काढले. गुंठेवारीत, उपनगरांमध्ये अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. नाले भरून वाहू लागले. सायंकाळनंतर पावसाने उसंत घेतली.