Sangli monsoon forecast today
esakal
सांगली : जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता असून, मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात (Sangli monsoon forecast today) आला आहे. या कालावधीत आकाश ढगाळ राहील; मात्र बहुतांश भागांत पाऊस होणार नाही. जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची उघडीप राहिली आहे. कोयना, चांदोली धरण परिसरातही पावसाने उघडीप दिली आहे. दोन्ही नद्यांची पातळीत घटत आहे.