
सांगली : महिला विश्वचषक’वर सट्टा घेणाऱ्यास अटक
सांगली: महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तानमधील सामन्यावर ऊर्मिलानगर, लव्हली सर्कलजवळ येथे सट्टा घेणाऱ्या रोहित अनिल संकपाळ (वय २२, रोहिदासनगर, गावभाग) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण व संजयनगर पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला.
हेही वाचा: Sangali Lockdown: मिरजेत मद्यविक्री दुकानांबाहेर तळीरामांच्या रांगा
अधिक माहिती अशी, सध्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. त्यातील सामन्यांवर सट्टा घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी गुन्हे अन्वेषणच्या पथकाला दिले होते. आज सकाळी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना होता. हा सामना सुरू असताना ऊर्मिलानगर येथे सिंधू प्रभाकर सरोडे यांच्या घरात रोहित संकपाळ हा सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने महाराष्ट्र जुगार कायद्यातील कलमानुसार झडती वॉरंट तयार केले.
सरोडे यांच्या घरासमोर पोलिस पथकाने येऊन रोहितला हाक मारली. तेव्हा आतमध्ये महिला वर्ल्डकपचा सामना सुरू असून, रोहित हा मोबाईलवरून बोलत सट्टा घेत असल्याचे निदर्शनास आले. त्याला विचारणा केल्यानंतर महिला
Web Title: Sangli Woman Arrested Betting World
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..