

Sonam Wangchuk Sangli Women latest news
esakal
Dharmendra Pradhan resignation : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मालन फासे या वृद्ध महिलांनी सहभाग घेतला असून, त्यांच्या ठाम भूमिकेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा गुरुवारी १९ वा दिवस असून, मालन फासे या गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीत आंदोलनस्थळी ठाण मांडून आहेत. मुसळधार पाऊस, प्रतिकूल परिस्थिती याची पर्वा न करता आंदोलनात ठाम आहेत.