Sangli Politics :‘मिनी मंत्रालया’तून विधिमंडळात धडक! स्थानिक नेत्यांचा राज्यस्तरीय प्रभाव; चौघेजण झाले मंत्री

Mini Mantralaya Leaders : जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ म्हटले जाते, ते उगाच नाही. इथे घडलेले अनेक नेते पुढे विधिमंडळात प्रभावी ठरले, तर काहींनी थेट मंत्रिपद भूषवले. सांगली जिल्हा परिषद ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था न राहता, राज्यस्तरीय नेतृत्व घडवणारी राजकीय शाळा ठरली आहे.
Zilla Parishad leaders from Sangli who shaped Maharashtra politics.

Zilla Parishad leaders from Sangli who shaped Maharashtra politics.

sakal

Updated on

सांगली : ‘मिनी मंत्रालया’त आपल्या कामाचा प्रभाव पडणाऱ्या अनेक सदस्यांनी विधिमंडळातही दबदबा निर्माण केला. यात पाच अध्यक्षांचा समावेश आहे. शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव नाईक, आर. आर. पाटील, अजितराव घोरपडे यांनी मंत्री पद भूषवले, तर बी. एस. कोरे, संपतराव माने, धोंडिराम पाटील आणि मोहनराव कदम या अध्यक्षांनाही विधिमंडळात संधी मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com