
Sangli Zilla Parishad
esakal
Women Reservation : राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. विविध प्रवर्गांनुसार ठरविण्यात आलेल्या या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे. सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मिनी मंत्रालयात पुन्हा एकदा महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर पंचायत समिती सभापतींचेही आरक्षण आज जाहीर झाले आहे.