सांगली झेडपीला फेरआरक्षणातही लॉटरी 

ZP-Sangli
ZP-Sangli

सांगली - राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी मुंबई येथे आज काढण्यात आलेल्या फेरआरक्षण काढले. या सोडतीतही सांगली जिल्हा परिषदेचे आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण खुल्या गटासाठी पुन्हा राखीव आरक्षित झाले आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांनी समाधान व्यक्त केले आहे. खुल्या 19 गटांतील निवडणुकीकडे नजर लागून राहिली आहे. 

राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांची सोडत यापूर्वी 10 जून 2016 रोजी काढण्यात आली. त्यात सांगलीचे अध्यक्षपद खुल्या गटासाठी आरक्षित झाले. त्यावर आजच्या नव्या सोडतीतही पुन्हा शिक्कामोर्तब झाले. सोलापूर, लातूर जिल्ह्यांत सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी लागोपाठ दोनदा अध्यक्षपद आरक्षित झाल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील सोडतीत सुधारणा करावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने PIL NO. 85/2016 मध्ये दिले. त्यानुसार राज्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी नव्याने सोडत काढण्यात आली. 

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मंत्रालयात आज सोडत निघाली. ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, उपसचिव गिरीश भालेराव यांच्यासह ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यापूर्वीच्या सोडतीत सर्वसाधारण प्रवर्गातील सोलापूर, लातूर या जिल्हा परिषदा लागोपाठ दोनदा महिलांसाठी आरक्षित झाल्या. आजची सोडत काढताना मागीलवेळी महिलांसाठी आरक्षित असलेले सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि लातूर हे जिल्हे वगळून सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या उर्वरित जिल्ह्यांतून महिलांसाठी आरक्षण काढले. सोडतीत 11 जिल्ह्यांतून 4 जिल्हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी व 7 जिल्हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित काढले. 

खुले गट (19)- कवलापूर, नागेवाडी, उमदी, सावळज, जाडर बोबलाद, चिकुर्डे, विसापूर, खरसुंडी, कुंडल, भिलवडी, चिंचणी, बोरगाव, कसबे डिग्रज, डफळापूर, कोकरूड, बागणी, मणेराजुरी, कडेपूर, अंकलखोप. 

हे आहेत दावेदार.. 

कवलापूर ः निवासबापू पाटील-भानुदास पाटील 

बोरगाव ः जितेंद्र पाटील 

चिकुर्डे ः अभिजित पाटील 

सावळज ः राजू मोरे 

जाडर बोबलाद ः संतोष पाटील 

खरसुंडी ः जयदीप भोसले 

कुंडल ः शरद लाड, महेंद्र लाड 

भिलवडी ः संग्राम पाटील 

चिंचणी ः अविनाश पाटील 

कसबे डिग्रज ः संग्राम पाटील 

डफळापूर ः दिग्विजय चव्हाण, मन्सूर खतीब 

बागणी ः वैभव शिंदे, संभाजी कचरे, रणजित पाटील 

अंकलखोप ः दादासाहेब सूर्यवंशी 

उमदी ः ऍड. चन्नाप्पा होर्तीकर 

विसापूर ः सुनील पाटील, पतंगबापू मान 

दृष्टिक्षेपात... 

मतदान ः फेब्रुवारी 2017 

अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड - 21 मार्च 2017 

दहा सभापतींची निवड ः 14 मार्च 2017 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com