

सांगरुळमधील लुटमार दरोड्याचा छडा; दोन आरोपींना अटक केली, समवेत पोलिस यंत्रणा
Sakal
सांगरुळ : येथील सराफ व्यावसायिक तेजाराम पेराजी माळी यांच्यावर वाटेत हल्ला करून दागिने व रोकड लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी प्रवीण माळी व त्याची महिला साथीदार खुशबू जसराज परमार या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ११ लाख १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.