Sanjay Kaka Patil : संजय काका पाटील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार, भाजपमध्ये जाण्याची शक्यता

Sangli Politics आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ. त्यासाठी शनिवारी कार्यकर्त्यांशी संवाद करणार असल्याचे माजी खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
Sanjay Kaka Patil

Sanjay Kaka Patil

esakal

Updated on
Summary

कार्यकर्त्यांशी चर्चा प्रथम – माजी खासदार संजय पाटील यांनी २७ सप्टेंबरला कार्यकर्त्यांशी संवाद बैठक बोलावूनच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

स्वबळाचा इशारा – ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी “घड्याळ” चिन्हावर लढणार नसल्याचे संकेत दिले व स्वबळावर किंवा आघाडीतून लढायचे की नाही हे कार्यकर्त्यांच्या मतानुसार ठरवणार असल्याचे स्पष्ट केले.

जास्त ताकदीने निवडणूक लढवणार – आतापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा जास्त ताकदीने लढण्याची घोषणा; कार्यकर्त्यांना पक्षापेक्षा प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केले.

Zilla Parishad Sangli : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ. त्यासाठी शनिवारी कार्यकर्त्यांशी संवाद करणार असल्याचे माजी खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. निवडणूक ताकदीने लढवणार, पण कोणत्या पक्षातून? हे मात्र त्यांनी सांगण्याचे टाळत स्वबळाचे संकेत दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com