लोकसभाच लढणार, विधानसभेत मला इंटरेस्ट नाही

लोकसभाच लढणार, विधानसभेत मला इंटरेस्ट नाही

सांगली - माझ्याबाबत भाजपमध्ये संशयास्पद वातावरण निर्माण केले जात आहे. या कुरघोड्यांची खोलात जाऊन माहिती घेऊ. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात खासदार म्हणून मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी मी प्रबळ दावेदार आहे. मी लोकसभाच लढणार. विधानसभेत मला इंटरेस्ट नाही, असे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांनी स्पष्ट केले. 

भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीबद्दल लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्याकडून अंतर्गत नाराजी, विरोध होत आहे. याबद्दल ते म्हणाले, ‘कुणाचा विरोध आहे, असे वाटत नाही. 

आमदार, पदाधिकारी सगळे माझ्यासोबत आहेत. त्यातूनही कोणी संशयास्पद वातावरण निर्माण करत असेल तर त्याच्या खोलात जावे लागेल. भाजपमध्ये उमेदवारीची प्रक्रिया आहे. उमेदवारी मागण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. माझ्याबद्दल कोणाला अडचण असेल त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे सांगितले असेल. मी विद्यमान खासदार म्हणून प्रबळ दावेदार आहे. मी लोकसभाच लढणार आहे. विधानसभेत मला इंटरेस्ट नाही. 

खासदार पाटील म्हणाले,‘‘मी आयुष्यभर लढतच आलो आहे. विकासाचे ध्येय ठेवून मतदार संघात गेल्या पाच वर्षांत हजारो कोटींची विकासकामे झाली आहेत. मी विकासकामांवर आहे, कोणाच्या मागे लागण्याची मला गरज नाही. माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजपमध्येच आहेत. दोन महिन्यांपूर्वी आम्ही एकत्र बसलो होतो. माझ्याबद्दल कोणतीही नाराजी नाही. गोपीचंद पडळकर यांच्या नाराजीबाबत मात्र त्यांनी उत्तर देणे टाळले.’’ 

माझ्या उमेदवारीचे लगीन होऊ द्या
विधानसभेला तासगाव कवठेमहांकाळमधून कोण,  याबद्दल विचारता खा. पाटील म्हणाले,‘‘पहिल्यांदा लोकसभेचे आणि माझ्या उमेदवारीचे तरी ‘लगीन’ होऊ द्या. पुढच्या पुढे पाहू.’’ 

माझ्याविरोधात उमेदवारी नको म्हणतात...!
खासदार पाटील म्हणाले, माझ्याविरोधात विरोधी पक्षातून कुणी उमेदवारी घेण्यास तयार नाहीत, नको म्हणत आहेत. यावरुन भाजप आणि माझ्यादृष्टीने विजयाचा मार्ग सोपा आहे. गेल्यावेळी अडीच लाखांचे मताधिक्‍य होते. यावेळी तीन ते साडेतीन लाखांवर मताधिक्‍य नेण्याचा प्रयत्न आहे.

खासदार म्हणून मी पक्षाचा आणि विरोधकांचा, सर्वांचाच आहे. सर्वांची कामे केली. यामुळेच विरोधी पक्षातील कार्यकर्तेही माझ्यावर प्रेम करतात. माझ्यासाठी काम करायला तयार होतात, हे चांगलेच आहे.
- संजय पाटील,
खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com