संजय शिंदे करमाळ्यातुनच विधानसभा निवडणुक लढवणार

विजयकुमार कन्हेरे
गुरुवार, 14 जून 2018

आगामी विधानसभेची निवडणुक करमाळा मतदारसंघातुनच लढवणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी स्पष्ट केले. माढा मतदरासंघातून कधीही आमदारकीची निवडणुक लढवणार नसुन विरोधक अफवा पसरवत आहेत त्यावर विश्वास ठेउ नये.

कुर्डुवाडी - आगामी विधानसभेची निवडणुक करमाळा मतदारसंघातुनच लढवणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी स्पष्ट केले. माढा मतदरासंघातून कधीही आमदारकीची निवडणुक लढवणार नसुन विरोधक अफवा पसरवत आहेत त्यावर विश्वास ठेउ नये.

कुर्डुवाडी येथे के एन भिसे महाविद्यालयात माजी आमदार विनायकराव पाटील यांचा अमृत महोत्सव सोहळा कै. के. एन. भिसे यांच्या पुतळ्याचे आनावरण यासह इतर कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले माजी केंद्रिय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलेल्या विधानांवरुन अनेकांनी वेगवेगळे अर्थ काढले होते. त्यावेळी खासदार पवार यांनी बारामतीमधुन सुप्रिया सुळे यांना संधी दिली असे सांगत ज्येष्ठांनी बाजुला होत नविन पिढीला संधी दिली पाहिजे अशी भुमिका मांडली होती. नेतृत्वाची तरुण पिढी उभी करण्याची गरज ही व्यक्त केली होती. यावरुन अनेकांनी संजय शिंदे हे करमाळ्यातुन कि माढ्यातुन विधानसभा लढवणार याबाबत तर्कवितर्क लावत होते.

श्री. शिंदे यांनी आपली राजकिय भुमिका स्पष्ट करत करमाळ्यातुनच विधानसभा लढवणार असल्याचे सांगितले व त्याप्रकारची पोस्ट ही त्यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. खासदार पवार यांनी आपल्या भाषणातुन सांगितले होते की संजय शिंदे हे जिल्ह्याची धुरा सांभाळत आहेत. यावरुन शिंदे समर्थकांनी मोठा आनंद व्यक्त केला होता. 2014 मध्ये करमाळा विधानसभेची निवडणुक प्रथम लढवुन श्री. शिंदे यांना भरघोस मते मिळाली होती. त्यांचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला होता. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यापासुन श्री. शिंदे यांचा करमाळ्यात विकासकामे करण्याचा वेग आणखीनच वाढला आहे.

Web Title: Sanjay Shinde will contest the Vidhan Sabha elections karmala Constituency