सांगली जिल्हा परिषदेच्या माजी सभापतींचा शिवसेनेत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

जत - जिल्हा परिषदेचे माजी सभापती व एकेकाळचे आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर कार्यकर्ते संजीवकुमार सावंत यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, प्रवक्ते नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

जत - जिल्हा परिषदेचे माजी सभापती व एकेकाळचे आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर कार्यकर्ते संजीवकुमार सावंत यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, प्रवक्ते नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी मुलाखत दिली असून पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आगामी निवडणूकही लढविणार असल्याचे सावंत यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले आहे. 

संजीवकुमार सावंत म्हणाले, की भाजपमध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. मात्र, आमदार विलासराव जगताप यांच्या अवतीभोवती असणाऱ्या काही विघ्नसंतोषी व स्वार्थी कार्यकर्त्यांमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना मुद्दामहून डावलण्यात आले. त्यामुळे शिवसेनेतून माझ्या राजकारणाला सुरवात झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjeevkumar Sawant enters in Shivsena