सोलापुरात 'संविधाना'च्या समर्थनार्थ महामोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मोर्चेकऱ्यांच्या मागण्या
- मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे
- लिंगायत धर्माला स्वतंत्रपणे मान्यता द्यावी
- ओबीसी प्रवर्गातील जनतेची गणना करावी
- ऍट्रॉसिटी कायदा कडक करावा
- महिला अत्याचारातील सर्वच दोषींना फाशी द्यावी

सोलापूर - संविधानाच्या समर्थनासह विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चा समितीतर्फे शहरात मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. त्यात दलितांसह बहुजन समाजातील घटकांकडून एकीचे दर्शन घडले. महामोर्चात महिलांसह तरुण, तरुणींचा लक्षणीय सहभाग होता. संयोजन समितीतर्फे पाच प्रतिनिधीनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देत मोर्चेकऱ्यांची बाजू मांडली.

बहुजन क्रांती मोर्चा समितीतर्फे महिन्यापासून शहर व जिल्हाभरात प्रचारसभा झाल्या. त्यात विविध मागण्यांच्या मांडणीसह समाजबांधवांना महामोर्चात सहभागाचे आवाहन झाले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहराच्या चोहोबाजूंनी आबालवृद्धांचे जथ्ये बुधावर पेठ परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानात आले. बौद्ध, मातंग, चर्मकार, मेहतर, आदिवासी, भटके-विमुक्त, ओबीसी, मुस्लिम समाजबांधव, आंबेडकरवादी समविचारी घटक एकत्र आले. या सर्वांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मोर्चास सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर पार्क स्टेडियममध्ये मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत होणार आहे.

मोर्चेकऱ्यांच्या मागण्या
- मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे
- लिंगायत धर्माला स्वतंत्रपणे मान्यता द्यावी
- ओबीसी प्रवर्गातील जनतेची गणना करावी
- ऍट्रॉसिटी कायदा कडक करावा
- महिला अत्याचारातील सर्वच दोषींना फाशी द्यावी

Web Title: sanvidhan sanman morcha in solapur